
श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा अकॅडमीच्या वतीने तालुका क्रीडा संकुल राजुरा येथे श्री मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय खेळ दिवस कार्यक्रम घेण्यात आला.
प्रमुख पाहुणे – नगराध्यक्ष श्री. अरुणभाऊ धोटे
राजुरा येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा अकॅडेमीच्या वतीने तालुका क्रीडा संकुल राजुरा येथे श्री. मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय खेळ दिवस साजरा करण्यात आली आहे. या प्रसंगी राजुऱ्यांचे नरागध्यक्ष अरुणभाऊ धोटे यांनी श्री. मेजर ध्यानचंद यांच्या जीवन चारित्र्यावर प्रकाश टाकला व खेळाडूंना योग्य मार्गदर्शन केले.
या प्रसंगी श्री. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा अकॅडमीचे संचालक व मुख्य प्रशिक्षक पाशा शेख, सचिव योगिता मटाले यासह अनेक खेळाडू व क्रीडाप्रेमींची उपस्थिती होती.
