वाढोना-सावरखेडा-वरध मार्गे बस सुरु करा, राळेगाव आगारात युवासेना धडकली ,बसेस नसल्याने विद्यार्थी त्रस्त

सहसंपादक -रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील खेडे गावात एस टी. बस सुरु करण्यासाठी युवासेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) . राळेगाव एस टी आगारात धडकत निवेदन दिले आहे..
मागील अनेक वर्षांपासून राळेगाव तालुक्यातील खेडे गावात गावकर्‍यानी मागणी करून सुद्धा ST. बस सुरू झाली नाही काही गावात सुरु असलेल्या बस बंद करण्यात आल्या याचा त्रास गावकरी मंडळी ना होत आहे महामंडळाच्या बसेस नसल्यामुळे नाईलाजाने खाजगी वाहनात जनावरासारखे कोंबुन जिवघेणा प्रवास जनतेला करावा लागत आहे यामध्ये अपघात होउन जिवीतहानी होण्याची शंभर टक्के शक्यता आहे याला जबाबदार कोण ? राळेगाव तालुक्यात प्रत्येक गावातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी ये जा करत असतात त्यामध्ये मोजक्याच ( हायवे असणाऱ्या )गावाची विद्यार्थी पास देण्यात येत आहे जर शाळा बंद तर पास कशाला देता हा प्रश्न उपस्थित होतो . नाईलाजाने हायवेवरून विद्यार्थी पायी आपल्या गावी जात आहे व त्या मध्ये मुलिंची संख्या भरपुर आहे या मध्ये कोणतीही दुर्घटना होउ शकते कारण यापुर्वी भयंकर स्वरूपाच्या दुर्घटना झाल्या आहे राळेगाव मध्ये कार्यालयिन कामाकरता जनता चाळीस ते पन्नास किलोमीटर चा प्रवास करून येते त्यांना खाजगी गाड्यांची तिकीट परवडत नाही विषेश करून महिलांना . या सर्व गोष्टी युवासेना युवती सेना पदाधिकाऱ्यांना लक्षात आल्यानंतर अमोल राउत युवासेना विधानसभा संघटक यांच्या नेतृत्वात युवासेना – युवती सेना पदाधिकारी राळेगाव S T डेपोमध्ये जाउन डेपो मॅनेजर शशिकांत बोकडें शीं चर्चा करून त्यांना या संपुर्ण बाबी लक्षात आनुन निवेदन दिले . डेपो मॅनेजर नी जनते ला होणारा त्रास लक्षात घेउन त्वरीत तालुक्यातील राळेगाव वाढोणा मार्गे सावरखेडा वरध जंगल भाग असल्याने ही बससेवा त्वरित चालु करण्याचे आश्वासन दिले . जर राळेगाव तालुक्यातील जिथे मागणी आहे व ज्या बससेवा बंद करण्यात आल्या तिथे बससेवा त्वरीत सुरु करण्यात आल्या नाही तर शिवसेना स्टाईल ने उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे युवासेना युवतीसेने तर्फे म्हटले आहे यावेळी अमोल राऊत युवासेना विधानसभा संघटक,वृषभ दरोडे युवासेना तालुका अधिकारी, योगेश मलोंडे युवासेना शहर अधिकारी, प्रगती कावळे युवती सेना जिल्हा संघटीका, गौरव जिड्डेवार युवासेना तालुका संघटक, अखिल निखाडे उपतालुका अधिकारी वैभव लोनार,प्रदीप वडस्कर,गौरव तुराळे,सुरज कोटरंगे युवासेना विभाग अधिकारी,शितल सिडाम, ज्योती जगधरे, युवती सेना असंख्य शिवसैनिक ,किरण मेश्राम,पियुश मेश्राम,साक्षी मेश्राम,साक्षी झाडे,सुमित येरेकार,प्रज्वल भोकरे,प्रसाद कुमरे,उत्कर्ष चिडे,विष्णु जुमनाके, योगीराज मोहरले,ओम सिडाम,भुषन हिवरकर विद्यार्थी , व गावकरी उपस्थीत होते .