
प्रतिनिधी : शेख रमजान
बिटरगांव ( बु )पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या संपुर्ण परिसरात या वेळी तिथी प्रमाणे साजरी करणारी शिवजयंती ही या वेळी ठाणेदार कैलास भगत यांच्या पुढाकाराने संपूर्ण पोलिस पाटील याचीं शांतता कमिटी ची बैठक घेऊन यावेळी तिथी प्रमाणे साजरी होणारी शिव जयंती ही डी.जे मुक्त साजरी करावी असे सर्व पोलीस पाटील व शिवजयंती उत्सव समितीचे सदस्य यांना शांतता कमिटी च्या सभेमध्ये सांगण्यात आले होते. त्या अनुषंगाने बिटरगांव (बु)पोलीस स्टेशन परीसरातील सर्व पोलिस पाटील व शिवभक्तांनी तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यासाठी बिटरगांव (बु)पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावामध्ये डी जे मुक्त शिवजयंती उत्साहाला भरभरून प्रतिसाद दिला.डी जे मुक्त शिवजयंती उत्साहाला सर्वांचे प्रतिसाद बघुन परिसरातील जनतेचे ठाणेदार कैलास भगत यांनी आभार मानले.समोर येणारे सर्व सण व उत्सव हे आपण बिटरगांव (बु)परिसरात डी जे मुक्त होण्यासाठी पुढाकार घेऊ अशी प्रतिक्रिया ठाणेदार कैलास भगत यांनी दिली परिसरातील डी जे मुक्त शिवजयंती उत्सवांसाठी बिटरगाव पोलिस स्टेशन चे ठाणेदार कैलास भगत पी.एस.आय. शिवाजी टिपुर्णे, रवी गिते, रोशन सरनाईक, दत्ता कुसराम, प्रविण जाधव, अर्जुन राठोड, दत्ता कवडेकर, शरद चव्हाण आदी पोलिस कर्मचारी व पोलीस पाटील यांनी पुढाकार घेतला
