
सहसंपादक : रामभाऊ भोयर
अतिवृष्टीमुळे शहरातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहेत तसेच शेतकऱ्यांची अवस्था ही दयनीय आहेत अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरसकट कर्जमाफी करा अशा आशयाचा ठराव राळेगाव गाविकाच्या सर्वसाधारण आम सभेमध्ये घेण्यात आला असा ठराव घेणारी राळेगाव ग्राविका ही जिल्ह्यातली पहिली ग्राविका ठरली आहे संस्थेच्या परिसरामध्ये राळेगाव ग्राविकाची वार्षिक सर्वसाधारण आम सभा संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी ग्राविकाचे अध्यक्ष सचिन हुरकुंडे हे होते यावेळी विविध ठराव घेण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा कर्जमाफीतून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना वगळू नये अशा आशयाचा ठराव सर्व शेतकऱ्यांच्या संमतीने वार्षिक सर्वसाधारण आम सभेमध्ये घेण्यात आला याशिवाय शासनाने जुनी पिक विमा योजना लागू करावी शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा द्यावा व नुकसानीचे वगळलेले जुने क्लस्टर जसेच्या तसे लावावे कृषी समृद्धी योजना तात्काळ सुरू करावी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अतिवृष्टीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान द्यावे तसेच शासनाने सीसीआय तसेच नाफेडची तात्काळ खरेदी सुरू करावी व हमीभावामध्ये शेतकऱ्यांचा कापूस व सोयाबीन खरेदी करावा राळेगाव शहर नगरपंचायत मध्ये येत असल्याने शेतकऱ्यांना विविध शासकीय योजना पासून वंचित राहावे लागते ग्रामीण भागासाठी ज्या शासकीय योजना लागू आहे त्या शासकीय योजना राळेगाव शहरासाठी सुद्धा लागू कराव्या ज्यामध्ये विहीर स्प्रिंकलर सबसिडी फवारणी पंप पाईप मोटर पंप ताडपत्री या राळेगाव शहरातील शेतकऱ्यांना सुद्धा उपलब्ध करून द्यावा पांदण रस्ते अतिक्रमण मुक्त करून पांदण रस्त्याचे खडीकरण करावे आदी ठराव यावेळी घेण्यात आले सर्व शेतकऱ्यांनी एकमताने या ठरावांना मान्यता दिली यावेळी संस्थेचे शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच उपाध्यक्ष राजेश काळे संचालक जानराव गिरी कृष्णराव राऊळकर विनायक नगराळे तातेश्वर पिसे अशोक पिंपरे गजानन पाल विनोद नरड नितीन महाजन प्रभाकर राऊत विभा गांधी पुष्पा डाखोरे प्रकाश मेहता सचिव प्रदीप सोयाम सहसचिव अजय भावे कर्मचारी शंकर पिंपरे चैतन्य पिंपरे राहुल पचारे हेही उपस्थित होते
