
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
ग्रा.पं.करंजी ( सो ) ता.राळेगाव जि.यवतमाळ येथे
जल जीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या नवीन ५० हजार लिटर क्षमतेच्या पाणीटाकी ( जलकुंभ ) चे भूमिपूजन सरपंच प्रसाद कृष्णराव ठाकरे यांचे हस्ते दि २८ फेब्रुवारी २०२३ रोजी पार पडले.
गावातील वॉर्ड क्र.१ व वॉर्ड क्र.३ मधील नागरिकांना या टाकी मधून पाणी पुरवठा होणार असून क्षमता जास्त असल्याने भविष्यात गावकऱ्यांना पाण्याचा तुटवडा पडणार नाही असे सरपंच प्रसाद ठाकरे यांनी सांगितले.
या वेळी उपसरपंच अनिल कोडापे, ग्रा.पं.सदस्य मनोज खंडाळकर,कर्मचारी वाल्मीक कोडापे व गावकरी उपस्थित होते.
