
प्रतिनिधी:- चेतन चौधरी, नंदुरबार
दरवर्षी खान्देश व गुजरातच्या काही भागात श्रावण महिन्याच्या शुध्द पक्षात येणाऱ्या रविवारी अनेक कुटुंबात कानुबाई मातेची स्थापना केली जाते.
गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा उत्सव साजरा होऊ शकला नाही.
परंतु यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यावर्षी कानुबाई मातेची स्थापना मोठ्या उत्साहात झाली. या उत्सवात रविवारी कानुबाई मातेची स्थापना केली जात असून रोट(प्रसाद) केला जातो. कुटुंबातील व भाऊबंदकितील सदस्य या उत्सवासाठी एकत्र येतात. कोरोनाचे संकट लवकर संपावे व पुन्हा सर्व काही सुरळीत व्हावे अशी मनोभावे आर्त प्रार्थना सर्वांनी देवी समोर केली. एकोपा व प्रेम वाढवणारा ह्या उत्सवाची सांगता सोमवारी कानुबाई मातेचे विसर्जन वाजतगाजत करून केले जाते
