

प्रमोद जुमडे/ हिंगणघाट
समुद्रपूर :- तालुक्यातील शिवणी (हळदगाव) येथे काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक गोर-गरीबांच्या घराचे छप्पर उडाले असून अनेक घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घराची प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी पाहणी करून तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.
शिवणी (हळदगाव) येथे काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक गोर-गरीब घराचे छप्पर उडाले असून वीज पुरवठा ही पूर्णपणे खंडित झाला आहे. लोकांच्या घराचे छत्र उड्याल्याने व घरात पाणी शिरल्याने अन्न धान्य, विद्यार्थ्यांचे शालेय पुस्तक, पाण्याने पूर्ण पणे ओले झाले असून संपूर्ण संसार उघड्यावर आला आहे. या वादळी वाऱ्यामुळे मोठ-मोठे झाडे लोकांचा घरावर पडून गोरगरीब लोकांच्या घराचे प्रचंड मोठा प्रमाणात नुकसान झाले आहे. या अनुषंगाने आज प्रदेश सरचिटणीस ‘अतुल वांदिले’ यांनी शिवनी या गावातील घराची पाहणी करून तहसीलदार यांच्याशी दूरध्वनी द्वारे संपर्क साधून नुकसानग्रस्त घरांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना २४ तासाच्या आत आर्थिक मदत देण्यात यावी. असे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी मागणी केली.
यावेळी नुकसान ग्रस्त घराची पाहणी करताना अतुल वांदिले यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष अशोक वांदीले, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, मांडगाव सर्कलचे अनिल देशमुख, काढळी सर्कलचे महादेव वांदिले, विधानसभा बूथ अध्यक्ष अमोल बोरकर,उपसरपंच अनिल भगत, समुद्रपुर युवक तालुकाध्यक्ष तुषार थूटे, सर्कल अध्यक्ष अनिल आडकिने, राजू मुडे उपस्थित होते
