शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून माता सरस्वती मंदिर स्थापणा दिवस साजरा

प्रतिनिधी -प्रवीण जोशी
ढाणकी


यवतमाळ जिल्ह्यातील एकमेव सरस्वती मंदिर असलेल्या ढाणकी शहरातील शिक्षक कॉलनी मधील दिनाक 24 /2/ 2019 रोजी माता सरस्वती देवी मंदिराची स्थापना करण्यात आली होती. त्याच अनुषंगाने आज ढाणकी येथे विद्या व वाणि ची परमदैवता माता सरस्वतीचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सरस्वती मंदिरामध्ये 1100 लहान विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य वही व पेन वाटप करून वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. एकमुख, चार भुजा,  दोन्ही हाती वीणा घेऊन , एका हाती माळ आणि एका हाती पुस्तक पकडून देवी पांढरेशुभ्र वस्त्र परिधान करून स्मित हास्य करीत कमळाच्या फुलावर विराजमान मनमोहक आकर्षक व लोभनीय प्रसन्न असा चेहरा अशी आकर्षक मूर्ती असून झेंडूच्या फुलांच्या माळा, वाहिलेली पद कमल चरणावर आणि डोक्यावर विविध वाहिलेल्या फुलांमुळे व रोषणाईने मंदिर व देवीची मूर्ती अधिकच छान दिसत होती.मंदिराच्या आजूबाजूचा परिसर भक्तिमय वातावरणात दुमदुमून निघत होता. सकाळी आठ वाजता सरस्वती मातेची आरती झाली तदनंतर गावातील सर्वच शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य पेन व वही वाटप करण्यात आले. व महाप्रसादास लागली सुरुवात झाली .शैक्षणिक साहित्यासाठी शहरातील भाजपा शहर अध्यक्ष रोहित वर्मा, काँग्रेस प्रदेश समन्वयक अमोल तुपेकर, काँग्रेस व्यापारी आघाडी अध्यक्ष रुपेश भंडारी, सामाजिक कार्यकर्ते गजानन मिटकरे, पाणीपुरवठा सभापती संबोधी गायकवाड, यांचे सहकार्य लाभले तर प्रमुख उपस्थिती कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती बाळासाहेब चंद्रे पाटील ,डॉ लक्ष्मीकांत रावते. कृष्णा महाराज, व्यापारी संघांचे माजी अध्यक्ष विष्णुदास वर्मा, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष भास्कर पाटील चंद्रे, पोलीस पाटील रमण रावते, वसंता फुलकोंडवार, उल्हास देवांग, यांची होती.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक कॉलनीतील सर्व नागरिकांनी व आपुलकी फाउंडेशन व लोकमतचे ढाणकी प्रतिनिधी उदय पुंडे व पत्रकार मोहन कळमकर यांनी विशेष परिश्रम घेतले.