सावित्री येथे ढगफुटी सदृश्य पाऊस शेतजमिनी खरडल्या: शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी

वडकी: राळेगाव तालुक्यातील सावित्री ( पिंपरी) येथे दिनांक 26 जुलै रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडल्या गेल्या. शेतजमिनी खरडल्या गेल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
दिनांक 26 जुलै रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने अनेक शेतजमीनी खरडल्या गेल्या असून शेतकऱ्यांच्या शेतमालाचे खूप नुकसान झाले परंतु तलाठी व कृषी सहायकांनी गावातील शेत शिवारात भेट न दिल्यामुळे या गावातील नागरिकांनी त्याबद्दल रोष व्यक्त केला आहे. तसेच शेतमालाच्या झालेल्या नुकसानीचे मोबदला मिळावा अशी मागणी सावित्री या गावच्या नागरिकांनी केली आहे
.


सावित्री येथील तलाठी सातंगे यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधला असता त्यांनी त्यांच्याकडे तीन गावे असून आष्टोना व बाळापूर या गावातील शेतांचे पंचनामे सुरू असून त्या गावचे पंचनामे झाले की सावित्री येथील शेतशिवाराचे पंचनामे सुरू करणार आहे आज किंवा उद्याच सावित्री गावाच्या शेत शिवाराचे पंचनामे सुरू करणार त्यांच्याकडे तीन गावे असल्यामुळे व सध्याची पावसाची स्थिती सगळीकडेच असल्यामुळे आश्टोना ,बाळापुर येथील गावाचे पंचनामे सुरू असल्याने सावित्री या गावचे शेताचे सर्वे करून आज किंवा उद्या पंचनामा करणार असे सांगितले.


तलाठी सातंगे