
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
दिवाळी हा अंधारावर मात करून प्रकाशाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा देणारा सण, कृषी व्यवस्थेत या सणाला अनन्यसाधारण महत्व आहे. दिवाळीत शेतमाल घरी येऊन शेतकऱ्यांना हंगामातील सुगीची चाहूल लागते. यंदा मात्र या प्रकाशपर्वावर नापिकीच्या संकेताचे ढग दाटुन आले आहे. . नापिकीच्या काळोखात यंदा उजेडाचा सण झाकोळला जाण्याची चिन्ह दिसताहेत. सोयाबीन, कापूस, तूर या नगदी पिकांना अतिवृष्टीचा फटका बसल्याने यंदाची दिवाळी अंधारात जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
राळेगाव तालुक्यात यंदा अतिवृष्टी ने थैमान घातले. त्या सोबतच जुलै महिन्यात आलेल्या पुराने तब्बल 11 गावे पुराखाली गेली. तीन वेळा महापूर आला. नदी, नाल्या लगतची शेती पाण्याखाली बुडाली. अनेक शेतातील सुपीक माती वाहून गेली. ज्या शेतात पूर आला नाही त्या शेतातील पिकांना पावसाचा फटका बसला. कपाशी हे या तालुक्यातील महत्वाचे पीक यंदा या कपाशी ची अवस्था दयनीय झाली आहे. कपाशीची वाढच झाली नाही. पातीगळ मोठ्या प्रमाणात होतं आहे. बोन्ड गळत आहे. कपाशी वाचवन्यासाठी कर्जबाजारी होऊन शेतकऱ्यांनी महागडी रासायनिक औषध वापरली. नींदनावर खर्च प्रचंड झाला. दुसरीकडे सोयाबीन उत्पादक शेतकर्यांची अवस्था देखील बिकट झाली आहे. संवगनीच्या तोंडावर पाऊस आल्याने नुकसान झाले. तणाने रांन माजले त्या मुळे सोयाबीन ला याचा फटका बसला. त्यातच जे काही थोडे बहुत सोयाबीन हाती येणार त्याला बाजारभाव नाही. तिसरीकडे अतिवृष्टी ने तूर पीक जळले तुरीचे उत्पन्न यंदा सर्वात कमी होण्याचा अंदाज आहे. तूर हे शेतकऱ्यांकरिता नेहमीच महत्वाचे पीक ठरले आहे. कापूस सोयाबीन चा पैसा कर्जात निघून जातो हाती केवळ तुरीचे उत्पन्न उरते असा अनुभव आहे. पुढील हंगामाची तजवीज करण्यासाठी तूर शेतकऱ्यांच्या मदतीला येतं असते. या वेळी मात्र हा देखील दिलासा असणारं नाही.
नापिकीच्या स्पष्ट संकेताने राळेगाव तालुक्यात शेतकरी आत्महत्येच्या घटनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. जिल्हयात सर्वाधीक शेतकरी आत्महत्या राळेगाव तालुक्यात नोंदविल्या गेल्या. विशेष म्हणजे या आत्महत्या युवा शेतकऱ्यांच्या आहेत. त्या सोबतच अतिवृष्टी व पुरामुळे 4 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. ऐन पोळ्याच्या दिवशी दोन शेतकऱ्यांचा तळ्यात बुडून मृत्यू झाला, शेतकरी पती -पत्नी चा वरुड तलावाच्या बँक वॉटर मध्ये वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. संकटाची मालिका या तालुक्यात सुरु आहे.
दिवाळी तोंडावर असतांना गावोगावी एक निराशेचे गडद सावट निर्माण झाल्याचे दिसते. त्यातच महागाई चा वणवा जगणे मुश्किल करत असल्याने स्थिती अधिकच गँभीर झाली आहे. माय-बाप सरकार चे धरसोड धोरणं, निव्वळ भेटी देण्याचा सोपस्कार, आश्वसनाची खैरात या मुळे आपला कुणी वाली नाही. ही भावना वाढीस लागली. लबाडाचे आमंत्रण ठरू नये
एकीकडे अतिवृष्टीने शेतकरी संकटात असतांना शासकीय पातळीवर मात्र घोषणांचा पाऊस अव्याहत कोसळत आहे. विरोधीपक्षनेते ना. अजित पवार, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, ना. अंबादास दानवे, किशोर तिवारी आदींनी राळेगाव तालुक्यात भेटी देऊन नुकसानग्रस्त भागाची पहाणी केली. मदतीचे आस्वासन दिले. मात्र दिवाळी तोंडावर असतांना देखील कवडीची मदत पोहचली नाही. प्रशासनाने तत्कालिक मदत केली मात्र ती पुरेशी नाही. अतिवृष्टी चा निधी तालुक्याला प्राप्त झाल्याची माहिती आहे मात्र त्यात कधी तलाठ्याचा कामास नकार, कधी ग्रामसेवकांचा तर कधी कृषी विभागाचा असहकार ही कारणे सांगण्यात येतं आहे. त्यातही ही मदत नेमकी मिळणार किती या बाबत सांशकता आहेच. मदतीच्या घोषणा आकडेवारी खूप झाली मात्र हे लबाडाचे आमंत्रण ठरते की काय अशी धाकधुक शेतकरी वर्गातुन ऐकू येते.
