
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्या अंर्तगत येत असलेल्या झरगड येथे काराई गोराई माता देवस्थान व हनुमान व्यायम प्रसारक मंडळ झरगड यांच्या संयुक्त विधमाने कबड्डी चे प्रेक्षणीय खुले सामन्याचे आयोजन दिनाक २१ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी रोजी पर्यंत करण्यात आले असुन या मंडळाने एक लाख रूपये बक्षीसाची जंगी लुट ठेवली असुन पहीले बक्षीस ३१ हजार तर दुसरे बक्षीस २१ हजार तीसरे बक्षीस १५ हजार तर चौथे बक्षीस ११ हजार ठेवण्यात आले आहे तर वैयक्तिक बक्षिसे मोठ्या प्रमाणात असुन या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार प्रा श्री वसंतराव पुरके सर माजी शिक्षण मंत्री तर प्रमुख पाहुणे म्हणून राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रफुल्लभाऊ मानकर सेवादल जिल्हा अध्यक्ष अरविंद वाढोणकर राळेगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष अरविंद फुटाणे राळेगाव नगरपंचायत उपाध्यक्ष जानरावजी गिरी प्रदिप ठुणे राजेंद्र दुधपोळे प्रकाश पोपट सरपंच सौ चंदाताई आत्राम दिलीप भोकटे डॉ ज्ञानेश्वर मुडे अँड संदिप राडे मनोज आत्राम नरेश गेडाम सचिन राडे मोहन आत्राम या सह अनेक मंडळींची उपस्थित लाभणार आहे या कबड्डी सामन्याचे आयोजन राजु राडे प्रकाश झाडे जिवन मेश्राम सतिश पचारे योगेश लढी यांनी केले आहे तरी सर्व कबड्डी प्रेमीनी झरगड येथे येऊन आपले नाव नोद करावी अशी विनंती आयोजकांनी करण्यात आली आहे.
