
प्रतिनिधी भद्रावती- वनपरिक्षेत्र कार्यालय भद्रावती कार्यक्षेत्रातील चंद्रपूर – नागपूर महामार्गावरील टाकळी गावाजवळ रस्ता ओलांडताना एका बिबट्याचा अज्ञात ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू झाला.ही घटना दि.13 ऑगस्टला रात्री 8 वाजताच्या सुमारास घडली.
या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी शेंडे यांना मिळताच आपल्या चमुसह घटनास्थळी जाऊन पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणी करिता नेण्यात आले. बिबटचे वय व कोणत्या प्रजातीचा आहे हे मात्र वृत्त लिहिपर्यंत कळू शकले नाही. पुढील तपास वनविभाग करीत आहे.
