राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील सावंगी पेरका येथील शेत शिवारात अज्ञात इसमाने डुक्कराची शिकार करण्याकरिता गावठी बॉम्ब शेतात ठेवले असता येथीलच महिला मनोरमा बेडदेवार वय ४५ वर्ष ही महिला शेतात नीदंना करिता गेली असता शेतात एका कापडी फडक्यात काहीतरी गुंडाळून असावे असे तिला वाटले त्या महिलेने गुंडाळलेले फडके घरी घेऊन आली असता तिने घरी आल्यानंतर फडके सोडून पाहायला लागताच चक्क बॉम्बचा स्फोट होवून हातातील पाचही बोटाना गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली, मनोरमा बेडदेवार ही शेतात निंदन कामाकरिता गेली असता शेतात कोणीतरी अज्ञात इसमाने डुक्कराची शिकार करण्याकरिता फडक्यात बांधून गावठी बॉम्ब ठेवले असावे हा फडक्यात असलेला गावठी बॉम्ब तिला शेतात एका फडक्यात बांधून दिसला तिला असे वाटले की या बांधून असलेल्या फडक्यात कुणाचे काहीतरी पडले असावे तिने ते गुंडाळून असलेले फडके सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घरी घेऊन आली घरी आल्यानंतर बांधून असलेले फडके सोडून पाहात असतानाच चक्क बॉम्बचा स्फोट झाला असून घराच्या आजूबाजूचे नागरिकांना असे वाटले की सिलेंडरचा स्फोट झाला की काय म्हणून ना घराच्या आजूबाजूचे नागरिक धावून आले असता मनोरमा ची हाताला दुखापत होवून हात रक्तबंबाळ झाल्याचे दिसले असता नागरिकांनी मनोरमाला उपचाराकरिता लगेच ग्रामीण रुग्णालय राळेगांव येथे आणले असता तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे.
