ग्राम पंचायत बोर्डा बोरकर यांच्या वतीने हळदी – कुंकु कार्यक्रम उत्साहात साजरा

पोंभूर्णा तालूका प्रतीनीधी:- आशिष एफ. नैताम

पोंभूर्णा:- तालुक्यातील एक छोटसं गाव बोर्डा बोरकर दिवसेंदिवस विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे मंकरसंक्रातचे औचित्य साधून ग्राम पंचायतच्या संरपंचा सौ. रोहिनी नैताम यांच्या संकल्पनेतून हळदि कुंकू तथा महीला मेळाव्याचे आयोजन २५ जानेवारी रोजी अंत्यत उत्साहात करण्यात आले आणि या उपक्रमाला महिलांनीहि भरघोष प्रतीसाद देत कार्यक्रम यशस्वीतेपणे पार पाडला महिलांमध्ये एकोपा प्रेम आदर निर्माण व्हावे या निस्वार्थ भावनेनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले वान म्हणून सर्व महिलांना कुंडी वितरीत करण्यात आली त्या कुंडीमध्ये छोटस रोपट लावून त्याचं वटवृक्ष निर्माण करण्याचे संकल्प सर्व महिलांनी यावेळेस केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. रोहिनी नैताम, प्रमूख पाहुने म्हणून कु. पिंपळकर मॅडम मुख्याध्यापिका जि.प.उच्च प्राथमीक शाळा बोर्डा बोरकर, श्री. आशिष नैताम तालूका अध्यक्ष मनसे तथा पत्रकार, श्री. परसूरकर साहेब ग्रामसेवक, सौ.लीना नैताम तथा ग्राम पंचायत सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. रत्नमाला देवगडे यांनी केले तर प्रास्तावीक कु. पिंपळकर मॅडम यांनी करीत अत्यंत मोलाचे मार्गदर्शन उपस्थीत महिलांना केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्राम पंचायत शिपाई रवि भट, उमेश सिडाम संगणक परीचालक दिपक कुनघाटकर यांनी परीश्रम घेतले