९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाची शासकीय सुट्टी जाहीर करा- डॉ.अरविंद कुळमेथे , बिरसा ब्रिगेड चे कळंब तहसीलदार यांना निवेदन

सहसंपादक : रामभाऊ भोयर

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाची शासकीय सुट्टी जाहीर करावी या साठी आज बिरसा ब्रिगेड च्या वतीने बिरसा ब्रिगेड अध्यक्ष डॉ.अरविंद कुळमेथे यांच्या नेतृत्वात तहसीलदार कळंब यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल , मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री , जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले.

सन १९९४ संयुक्त राष्ट्राच्या संघाच्या आदेशान्वये भारत सरकारने जागतिक आदिवासी दिवस उत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे.त्या प्रमाणे दर वर्षी देशात आदिवासी जागतिक दिन मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातो.हा आदिवासींचा संविधान हक्क दिवस आहे. महाराष्ट्रातील आदिवासीं मोठ्या संख्येने एकत्र येऊन भारतीय संविधान पवित्र ग्रंथ मानून ,त्या दिवशी संविधानाचे वाचन करतात. तसेच आदिवासी संस्कृती जतनसाठी सांस्कृतिक कार्यक्रम व आपल्या हक्क अधिकाराचे प्रबोधनाचे कार्यक्रम घेऊन जागतिक आदिवासी दिवस उत्सव साजरा करतात.हा दिवस आदिवासींच्या अस्तित्व,अस्मितेचा,असल्याने,९ ऑगस्ट आदिवासीं दिनाची शासकीय सुट्टी जाहीर करावी असे निवेदन कळंब तहसीलदार यांना देण्यात आले.
यावेळी बिरसा ब्रिगेड चे डॉ. अरविंद कुळमेथे, प्रा.वसंत कनाके, उमेश येरमे,प्रमोद ईरपाते,सुनील मेश्राम,महेश सोयाम,रोशन घोडाम,किशोर कंगाले,दिनेश मडावी,गजानन ऊईके, बादल जुमनाके,गोलू कनाके,रमेश जांभूळकर,किशोर कासारकर, आदी उपस्थित होते.