जिल्हा परिषद कार्यालय समोर आशा व गटप्रवर्तकांचे बेमुदत आंदोलन सुरू

( सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी मान्य केलेल्या मागण्याचा जिआर काढा-आयटक )

सहसंपादक: रामभाऊ भोयर

गटप्रवर्तक महिलांना दरमहा दहा हजार रुपये मानधन वाढ, दरमहा आरोग्यवर्धिनीचे पंधराशे रुपये , कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सर्व हक्क व भाऊबीज. तसेच आशा महिलांना दरमहा सात हजार रुपये मानधन वाढ व भाऊबीज देण्याचा जीआर काढल्याशिवाय 12/1/2024 पासून सुरू केलेला बेमुदत राज्यव्यापी संप मागे घेतला जानार नाही असे आयटकचे कॉ.दिवाकर नागपुरे यांनी जाहीर केले आहे आजच्या 12 जानेवारी रोजी यवतमाळ जिल्हा परिषदेसमोर आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन करण्यात आले होते परंतु शासनाने जिआर काढला नाही त्यामुळे पुन्हा आयटकच्या नेतृत्वात आज २३ पासून आंदोलन सुरू केले.
जिल्हा परिषद समोर आशा वर्कर गटप्रवर्तक महिलांनी सरकार विरोधात तीव्र नारेबाजी करत हल्लाबोल केलाय 29 डिसेंबर पासूनच सर्व ऑनलाईन कामावर आशा गटप्रवर्तक महिलांनी बहिष्कार घातलेला आहे.तसेच
महाराष्ट्रात 12 जानेवारी पासून आयटकसह कृती समितीने बेमुदत संपाची हाक दिली असल्यामुळे आशा व गटप्रवर्तकांना आरोग्याच्या कोणत्याही कामाची सक्ती अधिकाऱ्यानीं करता कामा नये.
यापुर्वी महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांनी 18 ऑक्टोबर 2023 पासून बेमुदत संप केलेला होता. त्यासंदर्भात महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री श्री तानाजी सावंत यांनी दिलेल्या आश्वासनानुसार पुर्तता
केली नाही त्या घटनेस आज दोन महिने झाले आहेत. तरीसुद्धा जिआर अद्याप काढला नाही. महाराष्ट्र शासनाने जिआर काढला नसल्यामुळे महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांच्या मध्ये महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध असंतोष वाढत चाललेला असुन
यवतमाळ जिल्ह्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांनी या संपामध्ये जोरदार भागीदारी केलेली असून जिल्हा परिषद समोर २३ पासुन बेमुदत साकळी आंदोलन सुरू केलेले आहे येवढेही करून शासनाने जिआर काढला नाही तर दि.५-२-२०२४ ला संविधान चौकात रास्ता रोको करून जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे असे
कॉ.विजय ठाकरे कॉ.दिवाकर नागपुरे, वंदना बोंडे, आशा बडेराव, रेखा मुधाने, सुहासिनी भगत, सुनीता सोनटक्के,विजया आत्राम, मालाताई इंगोले , सुनंदा कांबळे , अर्चना तोंडरे ,रंजना सोनोने , रंजना राउत , छाया खडककर , माया सातपुते, मंगला रांखुडे ,सिमा पाटील, विजया तायडे, वर्षा वानखडे, बबिता चिंचोळे, गुंफाताई गेडाम, , कल्पना कांबळे, रंजना
वानखडे, सुनीता कुंभारे , ज्योती गुडेकार , वैशाली खीरटकर , लताबाई डाखोरे, सुधा मेश्राम, प्रतिभा ढोकने ,सनिता जयस्वाल रेखा बहाने,रेखा पांडे, अर्चना कुडुकर उर्मिला मोहुर्ले सुनिता झाडे, मंगला झाडें, कांचन जुमनाके, शालीनी पानघाटे, ज्योती वेले, अनिता खापने, रजनी धोटे, सोनाली वानखेडे,माया मरस्कोले, अनिता मडावी, वंदना उईके, संध्या चिंचोलकर , संगीता कुंभरे,यांनी कळविले आहे यावेळी शेकडो आशा व गटप्रवर्तक महीला आंदोलनाला उपस्थित होत्या….