

सहसंपादक-रामभाऊ भोयर
वडकी येथील डॉ पुरुषोत्तम इंगोले सांस्कृतिक भवनामध्ये शनिवार दि ८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ च्या दरम्यान डॉ नरेंद्र इंगोले मित्र परिवार तर्फे सामाजिक सलोखा राखत मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करून सामाजिक संदेश देण्यात आला.या इफ्तार पार्टीत मुस्लिम नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.वडकी येथे दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती,राम नवमी, हनुमान जयंती, ईद ए मिलाद यासह विविध सण उत्सव सर्वांच्या सहभागातून उत्साहात साजरे केले जातात. या भागात एकता आणि बंधूता टिकवून सर्वजण एकमेकांच्या कार्यक्रमात हिरीरिने सहभागी होतात. त्याच पद्धतीने सलोखा राखत इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रसूलभाई शेख,कार्यक्रमाचे अध्यक्ष ठाणेदार विजय महाले, तसेच जमा मस्जिद काजी मौलाना नदीम खान,माजी सरपंच डॉ नरेंद्र इंगोले,व्हाय.एफ सय्यद, किशोर पवार,त्रंबकराव महाजन, पत्रकार अमोल सांगानी,दीपक पवार,रामुजी भोयर हे व्यासपीठावर उपस्थित होते.ह्यावेळी मानवता हा एकच धर्म आहे या भावनेतून सर्वांनी एकमेकांचे सण उत्सव एकत्र येऊन साजरे करावेत त्यामुळे प्रत्येकाच्या मनात एकोप्याची भावना निर्माण होऊन जातीय सलोखा राखण्यास मोठी मदत होईल असे ठाणेदार विजय महाले यांनी इफ्तार पार्टी दरम्यान उपस्थितांना संबोधित केले.तसेच या इफ्तार पार्टीत माजी सरपंच डॉ नरेंद्र इंगोले, त्रंबकरावजी महाजन, किशोर पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते वैकुंठराव मांडेकर यांनी केले तर या कार्यक्रमाचे आयोजन डॉ नरेंद्र इंगोले मित्र परिवाराचे हेमंत कडू, शरद सराटे,वैभव इंगोले,सौरभ इंगोले,बंटी तेलतुंबडे,रुद्रेश केराम,आशिष केराम,गणेश केराम,गौरव उधार,अमोल राऊत,अथर्व बोरपे, तन्मय पिपराडे,आदर्श जगताप,यांनी केले होते.
