भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महाकाली मंदिरात भाविकांची अलोट गर्दी


प्रतीनिधी :प्रवीण जोशी, ढाणकी

ढाणकी येथील महाकाली मंदिर गावातील लोकांना व आजूबाजूच्या खेड्यापाड्यांना प्रचलित आहे. गावातील व आजूबाजूच्या परिसरातील लोकांना महाकालीका नवसाला पावणारी देवी म्हणून समज आहे. लोकांची महाकाली देवीवर फार श्रद्धाआहे. गेली दोन वर्ष कोरोनाच्या काळात या मंदिरात सर्वत्र शुकशुकाट होता. परंतु शासनाने सर्व कोरोनाचे निर्बंध हटविल्यामुळे आता पहिल्यासारखीच गर्दी पाहायला मिळत आहे. व मंदिरात आनंदमय व भक्तिमय वातावरण आहे. महाकाली मंदिरात गावातील लोक व आजूबाजूंच्या परिसरातील सर्व लोक दर्शनासाठी येत असतात. तिथे मुख्य पुजारी म्हणून विजू महाराज हे आहेत. पूर्वी मंदिराचे बांधकाम झालेले नव्हते. महाकालीदेवी चे मोकळे मैदान होते. अतिशय साधे बांधकाम केलेले होते. ढाणकीतील प्रतिष्ठित नागरिकांनी पुढाकार घेत.लोक वर्गणीतून भव्य दिव्य असे मंदिराचे बांध काम करण्यात आलेले आहे. मंदिरात अतिशय सुंदर व बोलकी अशी कालिंका देवीची मूर्ती आहे.मंदिरातच छोटेसे मंदिर असून त्यात श्री गणेशाची मूर्ती आहे.नवरात्र मुळे लायटिंग व झिलच्या रोषणाईने मंदिर व देवीची मूर्ती अधिकच छान दिसत आहे.मंदिराच्या आजूबाजूचा परिसर भक्तिमय वातावरणात दुमदुमून निघत आहे.