राष्ट्रवादिच्या परिवर्तन जनसंवाद यात्रेचे हिंगणघाट शहरात सुरुवात…

राष्ट्रवादिचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या संकल्पनेतून निघाली परिवर्तन जनसंवाद यात्रा…

हिंगणघाट शहरातील प्रत्येक प्रभागात घरोघरी जाऊन नागरिकांचा जाणून घेत आहे समस्या…

हिंगणघाट – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या संकल्पनेतून परिवर्तन जनसंवाद यात्रेचे आयोजन हिंगणघाट शहरात करण्यात आले आहे. परिवर्तन जनसंवाद यात्रेची सुरुवात शहालांगडी देवस्थान येथून हनुमानजीचे दर्शन घेऊन करण्यांत आली.
शहरातील प्रभागातील घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे काम या परिवर्तन जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून केलं जात आहे.सहा महिन्यांपूर्वी हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात हीच परिवर्तन जनसंवाद यात्रा केली होती. आता या परिवर्तन जनसंवाद यात्रेचा हा दुसरा टप्पा हिंगणघाट शहरात सुरू झाला आहे. अनेक प्रभागात विविध समस्या आहेत नागरिकांची काम देखील होत नाहीत यामुळे नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन नागरिकांशी संवाद साधण्यासाठी म्हणून अतुल वांदिले निघाले आहेत. परिवर्तन जनसंवाद यात्रेचे शहरात अनेक ठिकाणी महिला औक्षवंत करून स्वागत करीत आहे. शहरातील बेरोजगार युवकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, जेष्ठ नागरीक यांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी ही यात्रा शहरात निघाली आहे. यात्रेला शहरातील नागरिकांच्या प्रचंड प्रतिसाद मिळत असून त्यांच्या घरापर्यंत येऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहे.यामध्ये त्यांचा चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहरातील सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते…