आमदार डॉ. प्रा. अशोक उईके यांच्या उपस्थितीत शंकर पटाचे बक्षिस वितरण

सहसंपादक: रामभाऊ भोयर

राळेगाव येथे प्रशांत तायडे मित्र परिवार तर्फ्रे रावेरी रोड वर शिव लखिया ले आऊट मध्ये भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात आले, शुक्रवार 1 रोजी सकाळी ११ वाजता शंकरपटाचे उद्घाटन करण्यात आले असून या शंकरपटात तब्बल 3 लाख 21 हजार रूपये बक्षिसाची जंगी लूट करण्यात आली. या शंकरपटाचे आयोजक प्रशांत तायडे मित्र परिवार राळेगाव तालुका यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते, आज दिनांक 2 रोजी या शंकरपटाचे बक्षीस वितरण करण्यात आले असून जनरल गटात राजेंद्र तेलंगे रावेरी येथील सरपंच यांच्या लक्षा-राणा या जोडीने 6:36 वेळेत प्रथम क्रमांक रुपये 51000, सोपीनाथ देवस्थान यांच्या माहि-देवभाई या जोडीने 6:41 वेळेत द्वितीय क्रमांक रुपये 41000, अशोक पाटील यांच्या बजरंग- बन्सी या जोडीने 6:52 वेळेत तृतीय रुपये 31000, आशिष सालंकार यांच्या जोडीने चतुर्थ क्रमांक रुपये 21000, रवीभाऊ ताम्बीले यांच्या जोडीने पाचवा क्रमांक रुपये 15000 चे बक्षीस पटकाविले असून. दुसऱ्या क गटातील प्रथम पारितोषिक माउली- रॉकेट या जोडीने 6:67 वेळेत प्रथम क्रमांक रुपये 21000, दुसरा क्रमांक बारुद-सिकंदर या जोडीने 6:68 वेळेत द्वितीय क्रमांक रुपये 11000,सरकार-भवऱ्या या जोडीने 6:71 वेळेत तृतीय क्रमांक रुपये 9000 चे बक्षीस मिळविले तर राळेगाव तालुक्याची जाण ठेवून माजी सभापती प्रशांत तायडे यांनी तयार केलेला तालुका गटात समीर आवारी, राहुल गंडे, रोशन वाणी यांच्या जोडीने 7;08,7:10,7:36 या वेळेत प्रथम, द्वितीय, तृतीय असे रुपये अनुक्रमे 5000,3500,2500 चे बक्षीस प्राप्त केले असून यावेळी प्रमुख मान्यवर भाजपा तालुका अध्यक्ष चित्तरंजन दादा कोल्हे, अनिल राजुरकर,माजी सभापती प्रशांत भाऊ तायडे, संजय जी काकडे, विवेक दौलतकार, डॉक्टर कुणाल भोयर, नितीन झाडे,विनोद मांडवकर, वासुदेव पाल, बबनराव भोगारे , श्रीरंगजी चाफले, यांच्या उपस्थित हा भव्य दिव्य राळेगाव तालुका वासियासाठी नेत्रदीपक झालेल्या शंकर पटाच्या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण वी. आ. ड्रॉ.अशोक उईके व राळेगाव तालुक्यातील सर्व भाजपा तालुका व जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला.