दहेगाव ग्रामपंचायत चा मनमानी कारभार व इतर तक्रारीबाबत गावकऱ्यांनी गटविकास अधिकारी व आमदारांना दिले निवेदन

गावकऱ्यांचा उपोषणाला बसण्याचा इशारा

राळेगाव तालुक्यातील दहेगाव ग्रामपंचायत मध्ये मनमानी, भोंगळ कारभार सुरु असून गावातील समस्या कडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. दहेगाव ग्रामपंचायत ला गावकऱ्यांनी समस्या बाबत अनेकदा तक्रारी केलेल्या आहे त्याचा पाठपुरा सुद्धा केला आहे परंतु त्याचे निराकरण झाले नसून ग्रामपंचायत कार्यालयातील सचिव सतत गैरहजर असतात केवळ मासिक मीटिंग ला त्यांची उपस्थिती असते पुन्हा कधीही ते गावात दिसत नाही त्यांच्या विना ग्रामपंचायत कार्यालयाचा कारभार चालतो, जलजीवन मिशन अंतर्गत घरोघरी नळ योजना कार्यान्वित होत आहे त्याकरिता गावातील मुख्य रस्त्याचे सिमेंटचे पक्के बांधकाम असलेले रस्ते मध्यभागातून फोडण्यात आले याचे कोणतेहि नियोजन नसून आज रोजी गावातील एकही रस्ता चांगला ठेवला नाही यापूर्वी गावातील संपूर्ण रस्त्याचे कॉन्क्रेटीकरण झालेले होते मात्र आता रस्ते फोडल्यामुळे जाण्यासाठी अडचण निर्माण झालेली आहे, जलजीवन मिशन अंतर्गत अतिशय निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे यावर कोणाचेही देखरेख नाही, योग्यरीत्यांनी रस्त्याचे काम करून पाईप लाईन टाकने जरुरी असताना मात्र असे झाले नाही याबाबत अधिक चौकशी होणे आवश्यक आहे, पंधरावा वित्त आयोगा अंतर्गत जे काम झाले त्याची चौकशी होणे आवश्यक आहे, बरेचसे कामे झाले असे दाखवून परस्पर तसे बीले काढन्यात आले परंतु प्रत्यक्षात असे कोणतेही काम झालेले दिसत नाही केवळ पैशाचा अपव्य केलेला आहे त्यामुळे सदर गैरव्यवहाराबाबत जातीने चौकशी होणे आवश्यक आहे, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गरजू लाभार्थी वागळून सोयीच्या लाभार्थ्यांना घरकुलाचे वाटप करण्यात आले त्यामध्ये कोणताही आग्रक्रम निश्चित करण्यात आलेला नाही केवळ संबंधित पदाधिकारी यांच्या मर्जीतिल खास लोकांना सदर घरकुलाचे वाटप करण्यात आले त्याबाबत योग्य ती चौकशी व्हावी अशा अनेक समस्या बाबत ग्रामपंचायत दहेगाव विरुद्ध समस्त ग्रामवासियांची तक्रार असून याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी या आशयाचे निवेदन गटविकास अधिकारी व राळेगाव विधानसभेचे आमदार डॉक्टर अशोक ऊईके यांना देण्यात आले . प्रविण चौधरी, बादल बदखल, अमोल गमे अभिषेक जिवतोडे, विठ्ठल जोगी,अमर पेचे, भास्कर झाडे, देवेंद्र झाडे,अजय जुमनाके,सुरज मडावी, पुंडलिक मेश्राम, तसेच समस्त गावकरी आपल्या मागणी करिता उपोषणाला बसू असा इशारा सुद्धा देण्यात आला.