
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
यवतमाळ
ढाणकी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. परिसरातील साखर कारखाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव देत नसल्याच्या कारणांनी उत्पादक शेतकऱ्यांनी एक समिती तयार केली. ऊस गाळप करण्यासाठी कारखाने शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव मिळत देत नाही.त्याचबरोबर ऊस गाळपासाठी नेताना ऊसतोड कामगारांना पैसे द्यावे लागतात एकरी पाच ते सहा हजार रुपये खर्च द्यावा लागतो. कारखानदार व कामगारांच्या या पिळवणुकीमुळे ऊस उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आहे. रासायनिक खताचे वाढते भाव. ऊस उत्पादनासाठी लागणारा खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याकारणाने शेतकऱ्याच्या अंगावर कर्जाचा डोंगर वाढत चाललाय. शेतकऱ्याच्या ऊसाला हमीभाव दिल्या जात नाही मागील वर्षी बाहेरील साखर कारखान्यांनी शेतकऱ्याच्या ऊसाला २८०० रुपये दर दिला परंतु यवतमाळ जिल्ह्यातील कारखान्यांनी फक्त २४००/-रुपये भाव दिला ही तफावत लक्षात घेता ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी यावर्षी आक्रमक भूमिका घेत उसाचा पहिला किस्त ३२००/- रु देण्यात यावी. ऊस तोडीसाठी कोणतीही रक्कम कामगारांना देण्यात येणार नाही. परिसरातील कारखान्यांनी यावर्षीचा उसाचा दर निश्चित करण्यात यावा. योग्य दर देणाऱ्या कारखान्याला ऊस देण्यात येणार असल्याने बैठकीत निर्णय घेण्यात आला. ऊस उत्पादक शेतकऱ्याची पिळवणूक थांबावी , ऊसाला योग्य भाव मिळावा, ऊसतोड कामगाराकडून होणारी पिळवणूक थांबावी यासाठी समितीने आक्रमक भूमिका घेत उसाला योग्य भाव न देणाऱ्या कारखान्याला उसाचा धांडा ही देणार नसल्याची भूमिका यावेळी घेण्यात आली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या या समितीचे गठन करण्यात आले . आज दिनांक १/१०/२३ रोज रविवारी गंगाधर मिटकरी संकुलणा मध्ये घेण्यात आलेल्या बैठकीत सर्वांनुमते ऊस उत्पादक संघाची निवड करण्यात आली, यामध्ये ऊस उत्पादक संघाचे अध्यक्षपदी प्रगतिशील शेतकरी बाळासाहेब शहापुरे, सचिव पदी गोपालसिंह गौर, उपाध्यक्षपदी बकाजी रावते, सन्माननीय सदस्य म्हणून कांतामामा मिटकरी, दीपक नाईक गांजेगाव, संजय कुंभारवार, संजय सल्लेवाड, सुरेश कोठारी, मारोतराव रावते सावळेश्वर, गिरीश रावते सावळेश्वर, शेख हबीब शेख खाजा, सुदर्शन रावते, छबुराव धोपटे, नितीन चिन्नावार, विनोद बळवंतराव नाईक,
नितीन अरुण येरावार,
या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थिती होते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळू पाटील चंद्रे ढाणकी नगरपंचायत चे उपाध्यक्ष शे. झहीर भाई, इमाम भाई, रुपेश भंडारी, अमोल तुपेकर, व सर्व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
उत्पादक शेतकऱ्यांना उसाचा योग्य दर मिळावा व उत्पादकांची होणारी पिळवणूक थांबावी यासाठी या समितीचे गठन करण्यात आले. सर्व ऊस उत्पादक शेतकरी यावेळी आवर्जून उपस्थित होते.
