संत दर्शन हेच श्रेष्ठ दर्शन,कीर्तनकार :कांचनताई शेळके.


दिनांक एक तारखेला ढाणकी येथील राजमाता दुर्गोत्सव मंडळाने युवा कीर्तनकाराच्या कीर्तनाचे आयोजन केले होते यावेळी युवा कीर्तनकाराचे, किर्तन श्रवण करण्यासाठी शहरातील आजूबाजूच्या खेड्यामधून बरीचशी जनता आली होती गेल्या अनेक दिवसांपासून धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन कोरोना महामारी मुळे करता आले नाही. पण अशा कार्यक्रमामुळे नक्कीच युवकांमध्ये सुज्ञ सुजाण कर्तबगार बनण्याची गुण निर्माण होण्यास मदत होईल. यावेळी युवा कीर्तनकार म्हणाल्या संत किर्तनाच्या माध्यमातून अध्यात्म प्रदेशात आपली यात्रा घडवितात ईश्वराचे दिव्य स्वरूप कीर्तनाच्या माध्यमातून आपल्यासमोर उभे करतात संत कीर्तनाच्या माध्यमातून रसाळ भाषेतून पांडुरंगाचे दर्शन घडवतात संत दर्शन म्हणजे साक्षात भगवंत दर्शन होय, असे यावेळी कीर्तनकार म्हणाल्या तसेच कीर्तनाला घेतलेल्या अभंगाला अनुसरून व त्याचा उकल करताना त्या म्हणाल्या चार दिवस सुट्टी असल्या की आपण बाहेर फिरायला जातो परंतु संत दर्शनासाठी भगवंत दर्शनासाठी कधी आपल्या मुलांना घेऊन जाता का ? मुळात आपली श्रद्धा मजबूत आणि स्थिर नसते सगळीकडे फिरायला जाता मग संत दर्शनासाठी धार्मिक कार्यात का नको?प्रत्येक गोष्टी पुढे असणारा माणूस धर्माचा विषय निघाला की मागे वाटतो हे धगधगते वास्तव मान्य करावे लागेल.
संत दर्शन म्हणजे साक्षात भगवंताचे दर्शन होत शहरात संतांच्या आगमन झाले तर जरूर दर्शनाला जा, संत दर्शनासाठी पूर्व पुण्याई लागते जीवनात धर्माला स्थान हवे धर्माचे मर्म जाणून घ्या धर्माने आपले रक्षण करावे असे वाटत असेल तर आपण धर्मासाठी काय करतो हेही महत्त्वाचे आहे जो धर्माचे रक्षा करतो धर्म त्याची रक्षा करतो धर्माकडून अपेक्षा करण्याऐवजी धर्मासाठी कार्य करा संता प्रति व धर्माप्रती आस्था दृढ व मजबूत हवी आस्था टिकून ठेवा आपली असता दृढ नसते तर ते मुलायम असते सर्व कार्यास आपण उत्साहाने सहभागी होतो परंतु धर्मकार्यात मात्र आळस करतो प्रसादामुळे जिनवाणी श्रवण करू शकत नाही वक्र वृद्धामुळे आचरण करू शकत नाही परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थी ज्याप्रमाणे निवांत होतो त्याप्रमाणे धर्मकार्य म्हणले की आपण स्तव आळशी होतो असे यावेळी कीर्तनकार शेळके म्हणाल्या.


प्रतीनिधी :प्रवीण जोशी ,ढाणकी