
लोकहित महाराष्ट्र उमरखेड
तालुका प्रतिनिधी. संदीप जाधव
यवतमाळ जिल्ह्यातील आमदार श्री निलय नाईक महाराष्ट्र राज्य विधान परिषद सदस्य यांनी दिनांक 23/ 5/ 2023 रोजी. नागपूर ते गोवा जाणारा राष्ट्रीय महामार्ग या मार्गावरून माहूर, पुसद, कळमनुरी, औंढा नागनाथ शक्तिपीठ या मार्गावरून जोडण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस साहेब यांना निवेदन दिले व नुकताच अर्थसंकल्पात जाहीर केलेला पवनार वर्धा ते पात्रादेवी सिंधुदुर्ग महाराष्ट्र शक्तिपीठाला जोडणारा असा शक्तिपीठ गोवा ते नागपूर महामार्ग निर्मिती करण्यात येणार असल्याची आपण घोषणा केली आहे. त्यामध्ये सदर महामार्ग हा माहूर पुसद कळमनुरी औंढा नागनाथ असा झाल्यास या भागातील व मतदार संघातील लोकांना व भक्त जणांना धार्मिक स्थळांना भेट देणे सोईस्कर व्हावे व त्या भागातील विकास होऊ शकतो. तरी हा महामार्ग औंढा नागनाथ शक्ती पिठाला जोडण्यासाठी निवेदनाद्वारे माननीय श्रीआमदार निलय नाईक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली.
