शासनाच्या विविध योजना पोहोचवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करा : आमदार अशोक उईके

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात नवनवीन योजना शेतकरी व सर्वसामान्य जनता साठी राबविल्या जात आहेत त्या सर्व सामान्य पर्यंत पोहोचवण्यासाठी शासन प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न करावे असे आवाहन विभागाचे आमदार प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांनी प्रशासनाला केले पंचायत समितीच्या वतीने विविध विभागाच्या विकास कामांचा आढावा सभा कोल्हे सभागृहात घेण्यात आली यावेळी अध्यक्ष स्थानावरून आमदार उईके बोलत होते सभेला तहसीलदार डॉक्टर रवींद्रकुमार कानडजे गटविकास अधिकारी केशव पवार सहाय्यक निबंध कैलास कटारे चित्तरंजन कोल्हे उषा भोयर संजय काकडे डॉक्टर कुणाल भोयर सदाशिव महाजन संदीप तेलंगे आशिष इंगोले विद्या लाड जयश्री मांडवकर आधी सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आमदार उईके पुढे म्हणाले तालुक्यात पांदन रस्त्याचा अनुशेष आहे तो कमी करावा लागेल पांदण रस्त्याची लांबी वाढवावी लागेल महावितरणच्या माध्यमातून ठिकठिकाणी शेतकऱ्यांना व सर्वसामान्यांना भडसावणाऱ्या विजेच्या समस्या महावितरणला दूर करावा लागेल तालुक्यात अतिक्रमित शेताच्या विषय विविध समस्या असून अतिक्रमित शेतकऱ्यांना त्यांच्या नावाचे पट्टे द्यावे अनेकांना घरकुल मिळाले पण त्या जागेत त्यांच्या घरकुल होत नाही घरकुला पासून वंचित राहणाऱ्या सर्वसामान्यांना घरकुल मिळाले पाहिजे तालुक्यात लेआउट मध्ये अनेक समस्या आहे त्या सोडावे लागेल शेतकरी सन्मान निधीपासून अजूनही अनेक शेतकरी वंचित आहे त्यांना तो निधी मिळवण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न करावा सोबतच पंतप्रधान किसान सन्मान निधी यापासूनही काही शेतकरी वंचित असल्यास त्यांना तो निधी मिळण्यासाठी प्रयत्न करावे असावे. सोबतच तीनही जिल्हा परिषद सर्कल मध्ये अशाच प्रकारचे आमसभा घेण्यात यावी आयुष्यमान भारत योजना अंतर्गत लाभार्थी शोधाव्यात व त्या लाभार्थ्याला त्या कार्ड चे फायदे माहिती करून द्यावे याबाबत लोकप्रतिनिधी सुद्धा पुढाकार घ्यावा सिकलसेल व ॲनिमिया ग्रस्त रुग्णांना योग्य ती मदत शासनामार्फत दिली जाते ती दिले जाते आहे की नाही याकडेही प्रशासनाने लक्ष द्यावे सोबतच अपंगाचे प्रश्नही शासनाने तितक्यात तत्परतेने सोडवायला हवे तालुक्यात पैसा अंतर्गत अनेक गावे आहेत त्या गावांना जो निधी मिळतो तो निधी आवश्यक त्या बाजूवर खर्च केल्या जात आहे की नाही याबाबतही शासनाने संबंधित पैसा ग्रामपंचायतीच्या सरपंच व इतरांना योग्य ते प्रशिक्षण द्यावे ग्रामपंचायतला आपल्या निधीतून सार्वजनिक बिल भरावे लागते त्यासाठी निधी कमी पडतो तो निधी शासनाने भरावा यासाठी मी शासन स्तरावर प्रयत्न करणार आहेत ग्रामस्वराज्य अभियान सुद्धा गावागावात राबवले जावे यासाठी प्रयत्न करावे येत्या काही दिवसात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समाधान शिबिर तालुक्यात होणार आहेत त्या दृष्टीनेही शासन प्रशासनाने तयारीला लागावे असे आवाहनही आमदार उईके यांनी यावेळी प्रशासनाला केले आमसभेला तालुक्यातील सर्वच विभागातील ग्रामसेवक तलाठी इतर अधिकारी व पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते.