संस्कृती संवर्धन विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात संपन्न


(
राळेगाव : दि. १५ ऑगष्ट २०२३ : संस्कृती संवर्धन विद्यालय राळेगाव येथे स्वातंत्र्य दिनाचा ७६ वा वर्धापनदिन शाळेच्या मा. मुख्याध्यापिका सौ. मीनाक्षी येसेकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाने संपन्न झाला. यावर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता म्हणून दि. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट पर्यंत दरदिवशी ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले. तसेच ३ दिवसात विद्यार्थांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यात वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा , देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, नृत्य,चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, प्रश्नमंजुषा आदींचे आयोजन करण्यात आले होते. कु. पूर्वा कुसाम, मानसी आडे, स्नेहा सोनटक्के, जान्हवी काटकर, दीक्षा नान्हे, रोशनी कार्लेकर, तनुश्री धनवीज, वैष्णवी नागमोते,पलक अवघडे, सिमरन बिहुनिया, मयुरी मडावी, अंजली सोनटक्के,धनश्री गेडाम, भूमिका जाधव , इत्यादी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. चेतन कोवे या विद्यार्थ्यांने तिरंग्यासह ध्जस्थळाची हुबेहूब प्रतिकृती तयार केली. चित्रकला स्पर्धेत कु.दीक्षा नान्हे, वेशभूषा स्पर्धेत कु. भूमिका जाधव आणि वक्तृत्व स्पर्धेत कु. स्नेहा सोनटक्के तर निबंध स्पर्धेत कु. मानसी आडे या विद्यार्थिनीं प्रथम क्रमांकात आल्या.
दि. ९ ऑगस्ट या क्रांतीदिनी विद्यार्थ्यांनी घेतलेली पंचप्रण- शपथ स्वातंत्र्य दिनाचे औचित्याने सर्वाना देण्यात आली.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी येसेकर तसेच पालकामधून अतिथी सुनील पारीसे उपस्थित होतेऋ
सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन योगेश मिटकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सीमा देशमुख,दिनकर उघडे, राकेश नक्षिणे, ज्ञानेश्वरी आत्राम, सलमा कुरेशी, देवेंद्र मून, भाग्यश्री काळे,विलास ठाकरे, अनंता परचाके, प्रकाश अंबादे, मुकुंद मानकर इत्यादींनी परिश्रम घेतले.