

समृद्धी महामार्ग तयार झाल्यापासून या महामार्गावर अनेक अपघात होत आहेत. सतत या महामार्गावर अपघात झाल्याच्या घटना आपल्याला ऐकायला मिळतात. वाहनाचे टायर फुटून, जंगली जनावर आडवे येऊन तसेच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने या महामार्गावर अपघात होत असतात. सध्या देखील या महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. बुलढाण्यामध्ये अत्यंत भीषण अपघात झाला आहे. नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या खासगी बसचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
सिंधखेडराजा येथील पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर बस डिव्हायडरवर आदळली. आणि हा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, त्यामुळे बस पलटी झाली आणि बसला अचानक आग लागली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बसमधून प्रवास करणाऱ्या 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत.
या अपघातामध्ये बस जाळून खाक झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच तेथील स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्यास सुरुवात केली. या बसमधील 20 प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढले असून या सर्व मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांनी केली मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर
