
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव येथील भुपेंद्र कारीया गेल्या अनेक महिन्यापासून माणुसकीची भिंत हा सामाजिक उपक्रम चालवीत आहे. त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन अ. भा. ग्राहक पंचायतीचे विदर्भ प्रांत अध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष प्रा. डॉ. नारायणराव मेहरे यांनी या उपक्रमाला भेट देऊन सुरू असलेल्या कामकाजाबद्दल माहिती जाणून घेतली व उपक्रमाचे कौतुक केले. त्यांनी स्वता 40 कपडे भेट देऊन आपला हातभार लावला.. याप्रसंगी यवतमाळ जिल्हा ग्राहक पंचायतचे कोषाध्यक्ष अनंतराव भिसे, प्रसिद्धीप्रमुख डॉ. शेखर बंड, यवतमाळचे शहराध्यक्ष ऍड. राजेश पोहरे,तालुका शाखेच्या अध्यक्ष डा के एस वर्मा,संघटक विनय मुणोत,सदस्य गजानन काळे हजर होते. माणुसकीची भिंत परिवाराचे मधुकरराव गेडाम, युसुफ सय्यद, मेघश्याम चांदे, रामकृष्ण कारमोरे, वाल्मीकराव मेश्राम आदी उपस्थित होते.
