
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील उत्कृष्ट सेंद्रिय शेती करणारे असे प्रगतीशील शेतकरी हरीश मारोतराव काळे यांचा पत्नीसह सत्कार करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे. बळीराजा स्वराज्य सेना बळीराजा जनकल्याण (एनजीओ) या सामाजिक संघटनेच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा व डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे वस्तीगृहाचे उद्घाटन या कार्यक्रमाच्या निमित्ताने. हा सत्कार करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेंद्र गद्रे यांनी १८ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे अवचित साधून उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना. बळीराजा स्वराज्य सेनेचा एकच नारा अन्नदाता शेतकरी सुखी भव व बळीराजा सेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या मुलासाठी वस्तीगृहाची उभारणी करण्यात आली आहे. बळीराजा संघटनेचे एकच लक्ष अन्नदाता सुखी झाला पाहिजे आणि तो जगला पाहिज शेतकऱ्यांच्या मुली, मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे या उद्देशाने डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावाने वस्तीगृहाची उभारणी करण्यात आली आहे. या वस्तीगृहाला रायगड इमारत नारंगे, असे नाव दिले असल्याचे नरेंद्र गद्रे (संस्थापक बळीराजा सेना एक सामाजिक संघटना यवतमाळ) यांनी सांगितले आहे. सदर नव्याने वस्तीगृह उभारण्यात आलेल्या रायगड बिल्डिंग यवतमाळ येथे १८ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सेंद्रिय शेती करून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून सेंद्रिय शेती मालावर प्रक्रिया करून विक्री व्यवस्थापन करणे व शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन करणे अशा शेतकऱ्यांचा इथे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे.तर यात रिधोरा येथील शेतकरी हरीश मारोतराव काळे व सौ रजनी हरीश काळे या पती-पत्नी दोघांचाही या सामाजिक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे सदर हरीश काळे या शेतकऱ्यांची तालुक्यातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेती उत्पादक म्हणून ओळख आहे. हा शेतकरी सेंद्रिय शेती करून शेतात पिकलेल्या मालाची स्वतःच विक्री करत आहे. तर या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये सेंद्रिय खतापासून तयार केलेले पीक केळी, ऊस, गहू, हळद, तूर, पपई, टमाटर, व इतर पाल्याभाज्या अशे विषमुक्त पिक तयार करून स्वतः विक्री करत असल्याने यांची राळेगाव तालुक्यासह जिल्ह्यात ओळख असल्याने १८ फेब्रुवारी रोजी हरीश काळे व त्यांची पत्नी सौ रंजनी काळे या दोघांचाही या सामाजिक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे. सदर सत्कार करतेवेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेंद्र गद्रे (संस्थापक बळीराजा सेना एक सामाजिक संघटना यवतमाळ), कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर विजय माने (संयोगी अधीष्टाता शासकीय अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ), खुशाल ठाकरे (ग्रामगीताचार्य यवतमाळ), प्रा. प्रवीण भोयर (शिवाजी जुनिअर कॉलेज यवतमाळ), डॉक्टर महेंद्र धावडे( राष्ट्रीय प्रमुख बळीराजा संशोधन केंद्र नागपूर), बाळासाहेब रास्ते (मुख्य संयोजक सांगली) यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे
