
सहसंपादक : रामभाऊ भोयर
गरीब कल्याण योजनेअंतर्गत रेशन दुकानदारा मार्फत वाटप करण्यात आलेल्या धान्यासाठी रेशन दुकानदारांना प्रति किलो १ रुपया ५० पैसे प्रमाणे क्विंटलला १५० रुपयाचे कमिशन देण्याचे शासनाने जाहीर केले आहे परंतु राळेगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे पाच महिन्यापासून कमिशन न मिळाल्याने या स्वस्त धान्य दुकानदारांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.
राळेगाव तालुक्यात ११४ स्वस्त धान्य दुकाने असून हे स्वस्त धान्य दुकानदार रेशनकार्ड धारकांना नियमित धान्य पुरवठा करतात मात्र या स्वस्त दुकानदारांना ऑक्टोंबर ते फेब्रुवारी पर्यंत म्हणजे पाच महिन्या पासूनचे अद्यापही कमिशन मिळाले नसल्याने हे दुकानदार आपल्या हक्काच्या मोबदल्यासाठी पुरवठा विभागाच्या कार्यालयाच्या पायऱ्या झिजवताना दिसत आहे. तरी वरिष्ठांनी याकडे लक्ष देवून स्वस्त धान्य दुकानदारांना त्वरीत कमिशन देण्याची मागणी स्वस्त धान्य दुकानदारानी केली आहे.
एस एन ए स्पर्श प्रणालीद्वारे दुकानदारांना कमिशन दिल्या जात होते परंतु शासनाकडून पूर्वीचे सॉफ्टवेअर बदल करण्यात आले त्यामुळे त्यांना कमिशन विलंब झाला आहे आता शासनाने नवीन सॉफ्टवेअर आणले असून स्वस्त धान्य दुकानदारांना कडून त्यांच्या कमिशन करिता आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक आदी मागविण्यात आले असून हे सर्व कागदपत्र वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यात आले आहे आता त्यांचे तीन महिण्याचे कमिशन या महिन्याच्या अखेरपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होईल
- पुरवठा निरीक्षण अधिकारी
- चंद्रकांत पाटील
