घराला आग लागून नुकसान,आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

सहसंपादक -रामभाऊ भोयर

यवतमाळ राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथे आज दुपारच्या सुमारास अंदाजे दोन वाजता आग लागून लाखो रुपयाचे नुकसान झाले
सविस्तर वृत्त असे की वाढोणा बाजार येथील जावेद खा पठाण यांचे बिछायत मंडप डेकोरेशन चा व्यवसाय होता अशातच आज उन्हाळ्याचा शेवटचा महिना व अति तापमान असल्यामुळे त्यांच्या घराला आग लागली यात बिछायत डेकोरेशन च्या साहित्यां सह घरातील धान्य व इतर साहित्य यामध्ये जळून खाक झाले सोबतच आगीने रुद्र रूप धारण करून संपूर्ण घराला वेढले यात सिलेंडर चा स्फोट झाला आहे या आगीमध्ये कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी जावेद खा कलंब खा पठाण यांचे अंदाजे दहा लक्ष रुपयाचे नुकसान झाले ही आग कशामुळे लागली याची अद्याप माहिती मिळाली नसली तरी उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे शार्ट सर्किट की कोणी माचीस ची ठिणगी टाकली असा अनेक तर्क वितर्क लावल्या जात आहे महसूल विभागाणे घटनेचा पंचनामा केला असून प्रभारी तहसीलदार दिलीप बदकी यांनी घटना स्थळाला तात्काळ भेट दिली आहे आगीची चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे.