
प्रतिनिधी:आशिष नैताम
सत्ता काँग्रेसची, पालकमंत्री काँग्रेसचे आणि आमदारही काँग्रेसचेच. असे असतानाही हे मानापमान नाट्य घडले?
पालकमंत्र्यांच्या शासकीय बैठकीत सत्ताधारी आमदारांचा अवमान.
चंद्रपूर:- दि. 15 मे रोजी पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा सभाचे आयोजन करण्यात आले होते. या आढावा बैठकीतील खरीप हंगामाच्या बैठकीत जिल्ह्यातील आमदारांना प्रेक्षक गॅलरीत बसविण्यात आल्यामुळे राजुऱ्याचे आम. सुभाष धोटे, वरोरा-भद्रावतीच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर, महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून येणारे चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीचा बहिष्कार केला.
खरिपाचे नियोजन करण्यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आढावा बैठकीत मानापमान नाट्य रंगले सत्ताधारी काँग्रेसचे खासदार आणि आमदारांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला त्यानंतर वडेट्टीवार यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आणि बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात या बैठकीचे आयोजन करण्यात आले अत्यंत महत्त्वाची बैठक असल्यामुळे खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार किशोर जोरगेवार बैठकीसाठी आले. आ. सुधीर मुनगंटीवार व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे बैठकीस आमदार आणि खासदार बैठकीच्या सभागृहात पोहोचतात त्यांना धक्काच बसला अधिकारी आणि पालकमंत्री यांची बसण्याची व्यवस्था मंचावर करण्यात आली. खासदारांना मंचावर स्थान देण्यात आले. मात्र आमदारांची बसण्याची व्यवस्था खाली करण्यात आली. त्यामुळे यावर तीव्र नाराजी व्यक्त करीत बहिर्गमन केले. खासदार धानोरकर यांनी ही आमदारांच्या या भूमिकेचे समर्थन करीत सभागृहातून ते बाहेर पडले. या सर्व प्रकारामुळे पालकमंत्री वडेट्टीवार यांनी संबंधित अधिकार्यांना चांगलेच खडे बोल सुनावले तसेच बैठकच रद्द केली.
पालकमंत्र्यांच्या शासकीय बैठकीत सत्ताधारी आमदारांचा अवमान…..
सत्ताधारी काँग्रेसच्या दोन आमदारांचा शासकीय बैठकीत अवमान झाल्याने या आमदारांनी बैठकीवरच बहिष्कार टाकल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सत्ता काँग्रेसची, पालकमंत्री काँग्रेसचे आणि आमदारही काँग्रेसचेच. असे असतानाही हे मानापमान नाट्य घडल्याने काँग्रेसमध्ये काय चाललं आहे, हे दिसून आलं.
चंद्रपूर शहरातील नियोजन भवनात आज जिल्हास्तरीय खरीप हंगामा आढावा बैठकीचे आयोजित करण्यात आली होती. पालकमंत्री विजय वडेट्टीवार बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीच्या बैठक व्यवस्थेवरून चांगलेच मानापमान नाट्य रंगले.
