
सहसंपादक : रामभाऊ भोयर
कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव च्या कारभाराची विशेष लेखापरीक्षण करून भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष अँड प्रफुल्ल चौहन यांनी दिं २२ सप्टेंबर २०२५ रोज सोमवारला शासकीय विश्रामगृह राळेगाव येथे पत्रकार परिषद घेऊन केली आहे..
यावेळी पत्रकार परिषदेत बाजार समितीचे गाळेवाटप व या संदर्भात दिलेली जाहिरात ही संभ्रम निर्माण करणारी आहे अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख २६ सप्टेंबर की २७ सप्टेंबर असा उल्लेख नाही जाहिरात मध्ये लिलाव कोण्या ठिकाणी होईल ठिकाणाचे स्थळ दर्शविले नाही.त्याच प्रमाणे गाळे वाटप अनुसूचित जाती,जमाती,अंपगा करिता राखीव ठेवणे बंधनकारक असते असे काही दिसून येत आहे .तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांची असून शेतकऱ्यांना गाळे मिळावे असा उद्देश असावा परंतु अर्जाची रक्कम अनामत रक्कम व सरकारी बोली रक्कम ही शेतकऱ्यांना न झेपणारी असून ही रक्कम कमी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली गाळे वाटपामध्ये प्राधान्यक्रम शेतकऱ्यांना दिला नसून प्राधान्यक्रम परवानाधारक खरीददार व अडते यांना देण्यात आल्याने जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना यातून टाळण्याचा हेतू आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्याच्या हिताचा विचार करता खरीप हंगाम संपायचा असून सध्या सर्व शेतकऱ्यांचे पीक शेतात आहे सोयाबीन कापूस कुठल्याही प्रकारचे पीक शेतकऱ्यांच्या पदरी पडली नाही शेतकऱ्याकडे पैसा नाही आणि म्हणून सप्टेंबर महिन्यात जाणीवपूर्वक शेतकऱ्याकडे पैसा नसताना ही गाळे लिलावाची प्रक्रिया आपल्या मर्जीतील लोकांना गाळेवाटप व्हावे याकरिता ठेवण्यात आली आहे तेव्हा हा कालावधी खरीप हंगाम संपल्यानंतर घ्यावा तसेच गाळे वाटपात ३ टक्के गाळे हे दिव्यांगांकरिता राखीव असताना कोणता गाळा राखीव आहे याचा उल्लेख नाही गळ्याची रक्कम एक मुस्त भरणा करणे हे शेतकऱ्यांकरिता न परवडणारी बाब आहे. तेव्हा गाळे वाटपाची प्रक्रिया खरीप हंगाम संपल्यानंतर घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. उपबाजार खैरी आवारामध्ये शासनाच्या निधीतून मोठ्या प्रमाणात बांधकाम करण्यात येत असून सदर बांधकाम करण्याकरिता निविदा मंजुरीनंतर नियोजित कालावधीत बांधकाम करण्यात आले नाही कालावधी संपूनही बांधकाम करण्याकरता कोणत्याही प्रकारची मुदतवाढ शासनाकडून न घेता तिथे बांधकाम सुरू असून यात अनियमित्ता व मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार सुरू असल्याचा आरोप अँड प्रफुल चौहान यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या कार्यकाळात व्यवस्थापन खर्च हा मर्यादेपेक्षा जास्त झाला असून या समितीच्या व्यवस्थापन खर्चाचे विशेष लेखापरीक्षण आवश्यक आहे समितीचा संपूर्ण कारभार संशयात पासून आर्थिक अनिमित्त गैरव्यवहार व भ्रष्टाचाराची चौकशी करून विशेष लेखापरीक्षण करण्यात यावे अशी मागणी पत्रकार परिषदेतून करण्यात आली यावेळी बाजार समितीचे संचालक गणेश देशमुख, रोशन कोल्हे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष चित्तरंजन कोल्हे, प्रवीण कोकाटे, अरविंद फुटाणे विवेक दौलतकार, प्रशांत तायडे भाजपा तालुका अध्यक्ष छायाताई पिंपरे ,आशिष इंगोले ,भाजपा शहराध्यक्ष शुभम मुके, डॉ कुणाल भोयर, संदीप तेलंगे, दिनेश गोहने, निश्चल बोभाटे, अभिजीत कदम, यांची उपस्थिती होती.
पत्रकार परिषदेत केलेले आरोप हे चुकीचे
याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँड प्रफुल्ल मानकर यांनी सांगितले की बाजार समितीने गाळे बांधून तीन वर्षाचा कालावधी होत आहे नुकत्याच झालेल्या आमसभेत गाळे वाटपाचा प्रश्न सभासदांनी उचलल्यामुळे ही तारीख निवडण्यात आली अर्जाची रक्कम लिलावाची रक्कम सरकारी बोली ही पणन संचालक मंडळाच्या आदेशाप्रमाणे ठरविण्यात आली असून बाजार समितीचा संपूर्ण कारभार पारदर्शक असून डी डी आर च्या उपस्थितीमध्ये बोली प्रक्रिया व संपूर्ण प्रक्रिया घेतली जाईल कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाला नाही पत्रकार परिषदेत केलेले आरोप चुकीचे असून त्यांनी संपूर्ण बाबीची शहानिशा करावी बाजार समितीचा कार्यभार पारदर्शक पद्धतीने चालविला जात आहे.
अँड प्रफुल मानकर
सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव.
