महापरिनिर्वाण दिनानिमित्त वडकी येथे काढण्यात आला कॅण्डल मार्च

सहसंपादक : रामभाऊ भोयर

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वडकी येथे बुद्ध विहारात आज दि ६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता गावातील भीम अनुयायांनी तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. नंतर सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास बुद्ध विहारातून भीम अनुयायांनी गावातील विविध मार्गाने कॅण्डल मार्च काढीत बाबासाहेबांना मानवंदना दिली.

कँडल मार्च दरम्यान भीमसैनिकांसह समाजबांधव व स्त्रिया पांढरे वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या

.भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गावातील मोठा उड्डाणपूल येथे सायंकाळी भीम अनुयायांनी अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.नंतर मोठा उड्डाणपूल येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिसमोर बुद्ध वंदना घेऊन सांगता करण्यात आली.
यावेळी वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे यांचे सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते