नगर पंचायत राळेगांव चे विषय समितीचे सभापती अविरोध निवड

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

आज पार पडलेल्या निवडीत राळेगांव नगर पंचायत च्या तीन विषय समितीचे सभापती काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी अविरोध निवडले आहे.
या वेळी अपक्ष नगरसेवक मंगेश अशोक राऊत यांनी रितसर सर्व काँग्रेस पक्षाचे नेते कार्यकर्ता मंडळी यांच्या समक्ष काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
बांधकाम समिती च्या सभापती पदी नगरसेवक मंगेश अशोक राऊत, आरोग्य व शिक्षण समिती च्या सभापती पदी काँग्रेस चे नगरसेवक कमलेशसिंह विलाससिंह गहलोत,तर महिला बालकल्याण समिती च्या सभापती पदी शिवसेने च्या सौ.सिमरन इमरान पठाण तर उपसभापती पदी अपक्ष नगरसेविका सौ पुष्पा विजय किन्नाके यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.
सध्या काँग्रेस पक्षाचे अकरा,सोबत तीन अपक्ष,एक शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट तर एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना एक व एक राष्ट्रवादी काँग्रेस असं बलाबल आहे.
काँग्रेस पक्षाचे प्रा.वसंत पुरके यांनी सकाळी हे नवीन पदाधिकारी निवडले.
या वेळी उपविभागीय महसूल अधिकारी राळेगांव यांना शैलेश काळे निवडणूक अधिकारी म्हणून तर अनूप अग्रवाल प्रभारी सी.ओ सह अन्य मान्यवर उपस्थित होते.