
कोंघारा येथील सातव्या सत्राच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव या कार्यक्रमा अंतर्गत कोंघारा कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी द्वारा दातपाडी येथील शेतकऱ्यांना आंतरमशागती बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यात कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी द्वारे शेतकऱ्याना शेतीच्या आंतरमशागतीच्या विविध पैलूच्या बाबतीत सविस्तर माहिती देण्यातआली.
यामध्ये प्रामुख्याने शेत पिकातील तण नियंत्रणासाठी पेरणी झाल्यानंतर तीन , सहा , व नऊ आठवड्यांनी शेतीची कोळपणी केली जाते. सुरूवातीची पिकांची वाढ संथ गतीने होत असते. त्यामुळे पिका व्यतिरिक्त तणांचा प्रादुर्भाव उगवून आल्यावर त्यात ठरावीक दिवसानंतर कोळपणी केली जाते. त्याचा मुख्य उद्देश तण नष्ट करणे आणि वाया जाणारी ओल थोपवणे हा असतो. तसेच पेरणी नंतर सुरुवातीच्या दोन तीन आठवड्याच्या कालावधीत तण नियंत्रण न केल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता असते , यासाठी कोळपणी करणे हिताचे मानले जाते. अशे विद्यार्थीनींनी शेतकऱ्यांना सांगितले. तसेच त्याचे फायदे असे की,कमीत कमी खर्चात व वेळेत तण निंयञण होते,जमिनीत हवा खेळती राहते, उत्पादनात वाढ होते,जमिनीची सुपिकता वाढते,सुक्ष्म जीवाणुच्या संख्येत वाढ होते,मशागतीचा खर्च कमी होतो,कीड, रोग यांच्यापासून बचाव करता येतो,शेतातील बुरशीचा फैलाव कमी होते, अशे अनेक फायदे अंतर्मशागतीमुळे होत असतात असे कुंभारा कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांना मार्गदर्शनात सांगितले.
या मार्गदर्शनाच्या कार्यक्रमांमध्ये कोंघारा कृषी महाविद्यालयाच्या सातव्या सत्राच्या विद्यार्थिनी व रासेश्वरी जुमडे, वैष्णवी काळे, शर्वरी दासोदे, सृष्टि गायमुखे, वैष्णवी कोटकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना शेतीची आंतर मशागतीबद्दलची माहिती देताना त्यांना कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रा. धाईत सर यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.धोके मॅडम,RAWE इन्चार्ज प्रा. येलोरे सर,कार्यक्रम अधिकारी प्रा. डि. आर. जाधव सर यांचे देखील मार्गदर्शन या कृषी विद्यार्थ्यांना लाभले .
