गणपती बाप्पा मोरया “! पुढच्या वर्षी लवकर या ! च्या घोषनेत बोरगडी तांडा येथील गावाकऱ्यांनी गणरायांना दिला शांततेत अखेर निरोप

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड


तालुक्यातील बोरगडी तांडा नं२ येथे संकट मोचन गणेश मंडळांच्या वतीने नऊ दिवसांच्या गणरायांची मोठ्या उत्साहात स्थापना केली होते.
या नऊ दिवसांमध्ये बाप्पांची येथील गणेश भक्तांनी दररोज पूजा अर्चना करून “बाप्पा ‘ना आज वाजत गाजत मोठ्या आनंद उत्साहात ” गणपती बाप्पा मोरया ,पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत गावातून अति शांततेत मिरवणूक काढून कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता, डीजे डॉल्बी सिस्टीम न वाजवता, आज गणरायाला अखेरचा निरोप दिला आहे.
बोरगडी तांडा येथे दरवर्षी एक गाव एक गणपतीची स्थापना मोठ्या उत्साहात केली जाते. येथील संकट मोचन गणेश मंडळ ही पूर्ण गावांच्या वतीने एकाच ‘ श्रीं ची स्थापना करून मोठ्या उत्साहात गणरायांचा उत्सव आनंदात साजरा करतात.
या गावांमध्ये कोणत्याही प्रकारच्या अवैध धंद्यांना वाव नसल्याने, अवैध देशी दारू, हातभट्टी पूर्णपणे बंद असल्याने येथील सर्वच सण, उत्सव मोठ्या उत्साहात व शांततेत साजरे केले जात असल्याची माहिती येथील तांडातील नाईक अमरसींग लिंबाजी नाईक व कारभारी- रामराव गुणाजी राठोड, यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.
पोलीस स्टेशन हिमायतनगर चे पोलीस निरीक्षक बी.डी. भुसनूर साहेब यांनी दिलेल्या सूचना, आदेशांचे पालन करत आम्ही डॉल्बी डीजे न लावता पारंपारिक वाद्य वरच भर देऊन पूर्ण गावभर मिरवणूक काढून व गणेश विसर्जन उत्सव शांततेत पार पाडत असल्याचे वृत्त येथील माजी सरपंच शामराव धेना राठोड यांनी सांगितले आहे.

यावेळी संकट मोचन गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव,तसेच सर्व सदस्य गावातील जेष्ठ नागरिक महिलावर्ग, बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित राहून “बाप्पा’ ना शांततेत अखेर चा निरोप दिला.