
सहसंपादक : रामभाऊ भोयर
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ च्या वतीने सुरक्षितता अभियान याची सुरुवात राळेगाव आगार येथे आजपासून झाली आहे या निमित्त आयोजित कार्यक्रमात आगार व्यवस्थापक शशिकांत बोकडे यांनी आगारातील चालक वाहक कर्मचारी यांना राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विशेष सूचना देण्यात आल्या यावेळी रस्ता सुरक्षा महिना अंतर्गत सुरक्षित प्रवास सुरक्षित प्रवासी त्याचबरोबर डेपोचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने सूचना देण्यात आल्या एसटी प्रवासात सर्व घटकांचा समावेश होत असून त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवणे हे आपले प्रत्येकाची जबाबदारी आहे याकरिता राष्ट्रीय कार्य म्हणून राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानात सहभागी व्हावे व आपल्या जीवन वाहिनी एक आदर्श मानून ही सेवा राष्ट्रीय सेवा म्हणून पाळावी असे आवाहन याप्रसंगी शशिकांत बोकडे यांनी केले याप्रसंगी माजी मुख्याध्यापक अशोक पिंपरे यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनीदेखील याप्रसंगी मार्गदर्शन केले यावेळी वाहतूक निरीक्षक संगीता मेश्राम महेश गलांडे गजानन पोल्हे मोहन ढोके भारत गेडाम जिनेन्द्र गाडेकर आकाश महाजन विनोद धोत्रे मंगला पंडित लक्ष्मण कराड योगेश रोकडे यांची उपस्थिती होती सर्वांनी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत सुरक्षित प्रवास करणार अशी शपथ घेतली
