अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी आरोपींना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी

वरोरा
वरोरा शहरातील लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनीला वाढदिवसाच्या निमित्ताने घरी बोलवत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी प्रमोद बालाजी बेलेकर , धनंजय रामभाऊ पारके यांना दिनांक 31 ऑगस्ट ला न्यायालयात हजर केले असता 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध ) कायदा 1989 अंतर्गत कलम वाढ करण्यात आली.

लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले आरोपी प्रमोद बालाजी बेलेकर,धनंजय रामभाऊ पारखी या दोन्ही घनिष्ठ मित्रांनी वाढदिवसानिमित्त पार्टी च बेत आखून महाविद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थिनीला आपल्या घरी बोलवून वाढदिवस साजरा करून भेटवस्तू (गिफ्ट) स्वरूपात चॉकलेट देण्यात आले त्याबदल्यात शिक्षकांनी मुलीला मिठी मारली. सहकारी शिक्षकांनी मिठी मारण्याचा प्रयत्न करीत विद्यार्थिनीच्या हात पकडला. या प्रकाराने भांबावलेल्या मुलीने घरी जात झालेला प्रकार आई वडिलांना सांगितला.अखेर पालकांनी सामजिक कार्यकर्ते च्या मदतीने पोलिस स्टेशन गाठले व गुन्हा नोंदविला.पोलिस अधिकाऱ्याने आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 3 ,74 ,49,3(5) , पॉक्सो अंतर्गत कलम 8,12 ,17 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.या घटनेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा 1989 अंतर्गत वाढ करून कलम 3 (1),(w),(I),(II) , व 3(2) (VA) चां समावेश करण्यात आला.सादर आरोपी ना पोलिस बंदोबस्तात चंद्रपूर ला रवाना करण्यात आले .सादर गुन्ह्याचा तपास आता उपविभागीय पोलिस अधिकारी नयमि साटम यांच्याकडे सोपविण्यात आला.

(आरोपींना न्यायालयीन प्रकरणात साठी हजर केले असता न्यायालय परिसरात वरोरा शहरातील असंख्य नागरिक ,सामजिक कार्यकर्ते यांची एकच गर्दी जमलेली होती.)