
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
यवतमाळ
जुनी पेन्शन योजना लागू करा या एकमेव प्रमुख मागणीसाठी आज सर्वच कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संपात सहभाग नोंदवला असून उमरखेड मध्ये सर्व कर्मचारी रस्त्यावर उतरले होते तहसील कार्यालयासमोरुन मोर्चा काढत “जुनी पेन्शन योजना लागू करा ” “शासनाच्या धोरणाचा निषेध असो ” या घोषणेने शहर दणाणून गेले होते आज पर्यंत राजकीय पक्षाचे मोर्चे बघितलेल्या नागरिकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी रस्त्यावर उतरलेले पाहून कुतुहल निर्माण झाले होते. मोर्चामधील कर्मचाऱ्यांची संख्या हजारोत असल्यामुळे शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. मोर्चा शहरातील मुख्य रस्त्याने येऊन परत तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मोर्चाची सांगता झाली त्यानंतर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सर्व कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले. आजच्या संपात महसूल कर्मचारी संघटना ,शिक्षक संघटना, ग्रामसेवक संघटना ,आरोग्य संघटना ,पंचायत समिती कर्मचारी संघटना ,कृषी सहाय्यक संघटना ,भू अभिलेख संघटना, जिल्हा परिषद बांधकाम विभाग कर्मचारी यासह अनेक कार्यालयातील राज्य कर्मचारी सामील झाले होते .
तहसील कार्यालयाच्या प्रांगणात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मत व्यक्त केले .यावेळी महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दीपक चव्हाण, शिक्षक संघटनेचे अमोल पाईकराव, ग्रामसेवक संघटनेचे कदम ,पंचायत समिती कर्मचारी संघटनेचे सुरोशे , कृषी सहाय्यक संघटनेचे भाग्यवंत ,तलाठी संघटनेचे गरुडे ,आरोग्य संघटनेचे मस्के सह सर्व पदाधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
( सोबत फोटो )
