
सहसंपादक : रामभाऊ भोयर
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या यवतमाळ जिल्हा (ओबीसी) विभागाच्या वतीने दिनांक 8/ 10 / 2024 रोज मंगळवारला जिल्हा स्तरावर कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन एम.डब्लू. पॅलेस जांब रोड यवतमाळ येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा. भानुदासजी माळी अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग हे राहणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. माणिकराव ठाकरे माजी अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी हे उपस्थित राहणार आहे.या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. कुणालजी चौधरी सचिव अखिल भारतीय काँग्रेस कमेटी, अँड. शिवाजीराव मोघे अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी कांग्रेस, प्राध्यापक वसंतराव पुरके सर माजी शिक्षणमंत्री हे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मा. वामनराव कासावार माजी अध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यवतमाळ जिल्हा , अँड.प्रफुल्ल मानकर अध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यवतमाळ जिल्हा, राजेंद्र राख राष्ट्रीय समन्वयक कांग्रेस ओबीसी विभाग, विजय राऊत अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र ओबीसी विभाग, कांचनकुमार चाटे अध्यक्ष मराठवाडा ओबीसी विभाग, राजीव घुटके विभागीय अध्यक्ष अमरावती विभाग, जेशाभाई मोटवानी उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग , राजाभाऊ हाडोळे उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग या मान्यवरांची राहणार आहे तर प्रमुख उपस्थिती मनिष पाटील, प्रविण देशमुख अरूण राऊत जावेद अन्सारी संजय ठाकरे टिकाराम कोंगरे राजीव कासावार कृष्णा कडू रमेश चव्हाण संध्याताई बोबडे आशिष कुळसंगे शैलेश गुल्हाणे राहूल ठाकरे बाळासाहेब मांगुळकर तातू देशमुख अशोकराव बोबडे संजय खाडे रविंद्र ढोक प्रदीप वादाफळे ज्ञानेश्वर बोरकर जितेंद्र मोघे वंदनाताई आवारी चंद्रशेखर चौधरी मोहन भोयर या मान्यवरांची राहणार आहे तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन यवतमाळ जिल्हा कांग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर अरविंद वाढोणकर , तसेच अनिल गायकवाड, प्रकाश जानकर,सौ.जया पोटे,सौ.स्वाती येंडे, डॉ अनिल देशमुख, अशोक तिखे, राजेंद्र गावंडे प्रविण सवाई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
