सहसंपादक : रामभाऊ भोयर
सण उत्सवा दरम्यान शहरासह परिसरातील वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही असे महावितरण विभाग नेहमी सांगते परंतु काही दिवसापासून वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रमाण अधिकच वाढले आहे त्यामुळे वीज ग्राहकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.
शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात काही दिवसापासून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे शहरातील अनेक भागातील नादुरुस्त विद्युत रोहित व त्यावरील उघडे किटकॅट बॉक्स लोंबकळत असलेल्या तारा वाकलेले विद्युत खांब आधीच इतर प्रकारामुळे विद्युत पुरवठा नेहमी सुरळीत राहू शकत नाही सध्या स्थितीत सण उत्सवाचा महिना सुरू असून धार्मिक कार्यक्रम जागोजागी होऊ लागली आहे परंतु वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे त्यामुळे अनेक अडचणीचा सामना वीज ग्राहकांना करावा लागत आहे.
२७ ऑगस्ट रोजी श्री ची स्थापना झाली आहे त्यानंतर आता काही दिवसांनी दुर्गादेवी ची स्थापना होणार असून या उत्सवात मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाची रेलचेल असते त्यामुळे महावितरण कंपनीने आपला कारभार सुधारावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. विशेष म्हणजे शहरात ३३ केवी केंद्र असूनही वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महावितरण ची यंत्रणा मात्र बिनघोर
वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण काही दिवसापासून अधिकच वाढले आहे अशावेळी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे कामे करायला पाहिजेत परंतु खाजगी व्यक्तीकडून ही कामे करून घ्यावी लागत आहे वीज कंपनीचे अधिकारी किंवा कर्मचारी सन उत्सवाच्या काळात बिनघोर दिसत आहेत
