
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणे सुरू आहेत यातील काही शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम मिळाली तर काहींना अजूनही मिळायची आहे पीक विम्याची रक्कम मिळताना ती 70 ते 80 हजार रुपये मिळेल असे सर्वेक्षण करायला आलेला कंपनीचा प्रतिनिधी सांगत होता पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच ते दहा हजार रुपये जमा झाल्याने पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना 80000 च्या स्वप्न दाखवले व प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर अल्पमदत जमा झाल्याने नेमकी माशी कुठे जिंकली याचा शोध सध्या शेतकरी घेत आहेत . यावर्षी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली अलीकडच्या दहा-बारा वर्षात पडला नसेल इतका पाऊस यावर्षी तालुक्यात पडला जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस राळेगाव तालुक्यात पडला त्यामुळे यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून भरीव रक्कम मिळेल अशी आशा होती मध्यंतरी कंपनीच्या प्रतिनिधीने तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी आणली त्या यादीनुसार शहरासह तालुक्यातील शेतांची पाहणी केली शेतकऱ्यांजवळची कागदपत्र जमा केली तेव्हा त्या प्रतिनिधीने सांगितले की तुम्हाला यावर्षी 70 ते 80 हजार रुपयांची मदत मिळणार आहेत शेतकरी त्या मदतीकडे आस लावून बसला होता कारण या वर्षी अतिवृष्टीमुळे नुकसानच तेवढे झाले होते गेल्या एक महिन्यापासून शहरासह तालुक्यातील नुकसानग्रस्त पिक विमा धारक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणे सुरू आहे त्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हजार रुपये पासून ते दहा हजार रुपये पर्यंत किंवा आणखी थोडी जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाली आहेत पण70 ते 80 हजार मिळणार होते व दहा हजार का मिळाले या प्रश्नाचे उत्तर मात्र कोणीच द्यावयास तयार नाही याबाबत शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत मिळालेले मदत ही पूर्ण मिळाली का किंवा आणखी शेतकऱ्यांना मदत मिळणार आहेत किंवा एवढेच रक्कम का मिळाली याशिवाय कोणत्या पिकासाठी किती नुकसान भरपाई मिळाली असे अनेक प्रश्न सध्या शेतकऱ्यांच्या मनात आहे या प्रश्नाचे उत्तर कुठे मिळेल हे मात्र शेतकऱ्यांना माहीत नाही कंपनीच्या प्रतिनिधीशी बोललो असता तो उडवा उडवी चे उत्तर देतो किंवा सरळ शेतकऱ्यांसोबत बोलतही नाही मग या प्रश्नांची उत्तरे कुठून मिळवावी हे मात्र शेतकऱ्यांच्या समजण्यापलीकडचे आहे मदतीची रक्कम आणखी मिळणार असेल तर ती कधी मिळेल हे सुद्धा कोणी सांगावयास तयार नाही म्हणजेच तुमचे नुकसान किती हो आम्ही जेवढी जेवढी मदत देतो ती घ्या व चुपचाप बसा असेच कंपनीचे धोरण दिसत आहेत याबाबत कोणाकडे दाद मागावी याचीही शेतकऱ्यांना माहिती नाही त्यामुळे कंपनीचे फावत असल्याचे दिसते संबंधीत कृषी विभागही याबाबत पुढाकार घेताना दिसत नाही सगळे कंपनीकडे बोट दाखवतात व मोकळे होतात आणि कंपनी तर कोणाच्या प्रश्नाला आपण उत्तर देण्यास जबाबदार नाही या अविर्भावात असते ।।। तुपकर सारखा नेता हवा ।।।। शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी नुकतेच आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला याआधीही अश्याच प्रकारचे आंदोलन त्यांनी पीकविमा प्रश्नीहीं केले आहे व शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे अशाच प्रकारच्या आंदोलनाची गरज सध्या तालुक्यात आहे पिक विमा प्रश्न तालुक्यात पाहिजे तसा कोणीही गंभीर घेतांना दिसत नाही शोकांतिका ही आहे की पिक विमाच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यासह विरोधकही बोलावयास तयार नाही आणि शेतकरी तर बरेच बरे आहेत रविकांत तुपकरासारखा तालुक्यात नेता असता तर निश्चितच तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा सन्मान जनक लाभ मिळाला असता आंदोलनाअभावी कंपनीची मुजोरी व अरेरावी वाढत असल्याचे दिसते व कंपनीची मानमानीही वाढली आहे याचा फटका माञ शेतकऱ्यांना बसत आहे.
