
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वरुड जहांगीर येथील विद्यार्थ्यांनी कुमारी वेदिका किरणकुमार निमट या मुलीची 19 वर्षे वयोगटातील खेळासाठी यवतमाळ येथे 7 तारखेला संपन्न झालेल्या खेळातून विभागीय स्तरावर कबड्डी खेळासाठी निवड करण्यात आली. वेदिका दिनांक 7/10/2025 रोजी जिल्हा स्तरावर चालत असलेल्या कबड्डी खेळासाठी राळेगाव तालुक्याचे इंदिरा गांधी महाविद्यालयातून प्रतिनिधित्व करण्यासाठी गेली.त्यामध्ये सेमी फायनलच्या खेळामध्ये अवघ्या दोन गुणांनी राळेगावचा संघ पराभूत झाला होता त्यातून एक उत्कृष्ट रेडर म्हणून तीने खेळाचे प्रदर्शन केले होते.त्याच्यातील हे गुण हेरून वेदिकाची विभागीय स्तरावर वाशिम येथे संपन्न होणाऱ्या खेळासाठी निवड करण्यात आली. वेदिका वाशिम येथे संपन्न होणाऱ्या कबड्डी खेळासाठी राळेगाव तालुक्याचे नेतृत्व करणार असून तीच्या या नियुक्तीमुळे तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.वेदिका हीने वर्ग पाचवीपासून ते दहावीपर्यंत श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेतले असुन त्याचवेळी वेदिकाला श्रावणसिंग वडते सर व मोहन बोरकर सरांनी अथक परिश्रम घेऊन खेळाचे प्रशिक्षण दिले होते.या वर्षी राळेगाव येथील इंदिरा गांधी महाविद्यालयात वर्ग अकरावीला शिकत असताना सुध्दा कोच सागर धोटे, सुमित सातघरे यांनी वेदिकाला खेळाचे प्रशिक्षण यांच्या कडून देण्यात आले. वेदिका ही वरूड जहांगीर येथील किरणकुमार निमट यांची मुलगी असून असंही वरूड जहांगीर हे गाव कबड्डीचे माहेरघर असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दिनांक 7/10/2025 रोजी कबड्डी खेळासाठी विभागीय स्तरावर निवडीचे श्रेय जिल्हा क्रीडा अधिकारी, संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक वसंतराव पुरके सर, प्राचार्य निमसटकर सर यांना देत असून वेदिकाच्या निवडीबद्दल खरेदी विक्री संघाचे संचालक श्रावणसिंग वडते सर, वसंत जिनिंगचे संचालक तथा ग्राम पंचायत सदस्य रामधन राठोड, सदानंद भोरे,पुनेश्वर उईके, प्रशांत भोरे प्रदीप निमट, भानुदास चव्हाण, गजानन ठाकरे, पुंडलिक आत्राम, मोहन पायघन, बबलू भोरे, शेषराव भोरे, उत्तम भोरे, राहुल भोरे, अविनाश खैरी, जनार्दन कडू, सचिन भोरे अरविंद उईके, हनुमान शिवरकर व वरूड जहांगीर येथील प्रतिष्ठित नागरिक तरूण युवक इत्यादींनी वेदिकाचे अभिनंदन केले आहे.
