
हिंगणघाट/प्रमोद जुमडे
जागतिक महिला दिन व महाशिवरात्रीच्या औचित्य साधून उन्हाळ्यात पक्षांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी. याकरीता जलपात्राचे वितरण करण्यात आले. मानव सेवा जीवदया व गौसेवा या उपक्रमांतर्गत नारायण सेवा मित्र परिवार हिंगणघाट या सामाजिक संस्थेच्या वतीने स्थानिक नागरिक बेघर निवाऱ्यात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसेंदिवस उन्हाची दाहकता वाढत आहे अशावेळी पिण्याच्या पाण्याकरता पक्षांची भटकंती सुरू असते. पाण्याअभावी पक्षांचा जीव तडफडू नये. याकरिता प्रत्येक नागरिकांनी आपल्या घराच्या छतावर जलपात्र ठेवून पक्षांना पिण्याकरीता पाण्याची सोय करावी. असे आवाहन याप्रसंगी मित्र परिवाराच्यावतीने करण्यात आले.कार्यक्रमाला भाग्यश्री खियानी, विद्या गिरी, लतिका बेलेकर , ज्योति धार्मिक, प्रतिभा सिंघवी, वैशाली खोपरागडे , किरण अग्रवाल, हेमा सोनकुसरे , अनुराधा मोटवानी, बबीता जोशी, कंचन खींवसरा, वैशाली पलांडे , वीरश्री मुड़े, नंदिनी जवादे,अलका रानपारा, कंचन ठाकुर,
रश्मी घायवटकर, गडवाल वैष्णवी मानकर,अनुष्का मुडे,नेहा मोटवानी,किनरी जवादे आदीसह नारायण सेवा मित्र परिवार चे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.