रावेरी ते राळेगाव रोडवरील पूल देतो अपघाताला निमंत्रण

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव ते वरुड रस्त्याचे काम हे प्रधानमंत्री सडक योजनेतून काही दिवसापूर्वी झाले असून झालेले काम हे निष्कृष्ट दर्जाचे असल्याचे जनतेच्या निदर्शनास येत आहे, राळेगाव ते रावेरी गावाच्या दरम्यान याच कामाच्या अंतर्गत झालेल्या पुलाचे काम हे पूर्णत्वास आले परंतु पुलाचे काम झाले असून पुलाच्या दोन्ही बाजूला खूप मोठ्या प्रमाणात दरी पडलेली आहे, जवळपास एक फुटाची दरी असल्याने आज रोजी मोठ्या प्रमाणात मोटरसायकलचा अपघात झाला त्यात सुदैवाने वाहन चालक बचावला त्यामुळे येजा करणाऱ्यांना त्यांच्या मोठा त्रास सहन करावा लागत आहे, कोणतेही वाहन जात असताना पुलाच्या दोन्ही बाजूने दरी पडल्याने नेहमी वाहन चालक हा त्या पुलावर आपल्या वाहणा सह पडताना दिसून येत आहे, गेल्या काही दिवसापासून तीन ते चार अपघात झालेले आहे, याची सूचना संबंधित विभागाला दिल्ली दिली तरी पावसाळ्यामुळे रोड दबत असतो व असे प्रकार होणारच असे उत्तर मिळाले चौकशीनंतर इंजिनिअर अली यांना विचारणा केली असता त्यांनी असे उत्तर दिले की, पावसाळा असल्याने रोड दबल्यानंतर पूर्ण काम आपण करू पाच वर्षे देखभाल ही आमच्याकडेच आहे आणि ते काम आम्ही योग्य करू असे सांगण्यात आले, परंतु पडलेल्या दरीमुळे होत असलेला आज रोजीचे अपघातात जबाबदार कोण? असे विचारणा केली असता दोन ते तीन दिवसात पाहणी करून कामाचा विल्हेवाट लावू असे थातूरमातूर उत्तर दिले, एखाद्याचा जीव गेल्यावरच काम होणार का? असा प्रश्न जनतेस पडताना दिसून येत आहे, तरी प्रशासनानी कामाची पाहणी करून पुलावरील दरीचे काम तात्काळ करून द्यावे अशी मागणी रावेरी कर जनतेतून होताना दिसून देत आहे.

Leave a Reply