
यवतमाळ जिल्ह्यातील ढगफुटी सदृश्य पावसाने नागरिकांचे खूप नुकसान झाले आहे.काही ठिकाणी जीवितहानी झाली तर काही ठिकाणी घरांची पडझड झाली.परंतु रस्त्यावर आले ते निराधारच.
मारेगाव तालुक्यात झडीच्या पावसामुळे धामणी गावात निराधार असलेल्या रुखमा नारायण क्षीरसागर यांचे राहते घर पडले . त्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.घरात असलेले अन्नधान्य ,कपडे साहित्य याचे प्रचंड नुकसान झाले आहे.गावातील शाळेत ,मंदिरात तात्पुरता निवारा म्हणून जागा शोधली आहे.परंतु किती दिवस हा पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध राहील. पूर्णपणे निराधार असल्याने त्यांना कोणाचाही आधार नाही त्यामुळे त्या एकट्या पुन्हा घर उभारू शकत नाही .त्यामुळे निराधार असलेल्या वृद्धेला शासकीय मदतीतून निवारा उभा करून देण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी बोलून दाखविली आहे.निराधार महिलेला तिचे हक्काचे घर देऊन शासनाने दिलासा द्यावा अशी मागणी निराधार वृद्ध महिला रुखमा क्षीरसागर यांनी केली आहे.
