सरपंच संघटना राळेगाव तालुका यांची तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन

सहसंपादक : रामभाऊ भोयर

तालुक्यातील सरपंच संघटना यांनी आज रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निवेदन सादर केले त्यात राळेगाव तालुका सरपंच संघटना आपल्या विविध मागण्यासाठी त्यातील घरकुल, विहीर, गोठा व ग्रामपंचायत च्या शासकीय कामाकरिता रेती उपलब्ध करून देण्यात यावी तसेच ग्रामीण भागातील घरकुल रकमेत वाढ करून शहरी लाभार्थ्याप्रमाणे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना सुद्धा 2.50 लक्ष एवढे अनुदान रक्कम मंजूर करून देण्यात यावी तसेच ग्रामपंचायत सदस्य यांची मीटिंग भत्ता चार ते पाच वर्षापासून थकीत असल्याने त्वरित ग्रामपंचायत सदस्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात यावी व सरपंच उपसरपंच यांचे मानधन त्वरित देण्यात यावे व सर्व शेतकऱ्यांना पिक विमा सरसकट देण्यात यावा अशा आशयाचे आज रोजी विद्यमान तहसीलदार साहेब यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली त्यावेळेस राळेगाव तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष अंकुश मुनेश्वर, राजाभाऊ तेलंगे, सचिव वर्षा ताई निकम, जिल्हा सरपंच संघटना अध्यक्ष विनोद काकडे, बाळु भाऊ धुमाळ, किशोर धामंदे, मोहन नरडवार, आषीश पारधी, सुधीर भाऊ जवादे, प्रविण येबंडवार ,विजुभाऊ धानोरकर, किशोर हिवरकर ,लताबाई घोटेकर, रमेश आत्राम ,प्रसाद ठाकरे ,शंकर राऊत, विशाल येनोरकर, उमेश गैवळकार ,वनिस भोसले, सुनील राऊत, विशाल भाऊ तोडासे ,रविंद्र चौधरी, कुणाल इंगोले, सौ.किरण महाजन, सौ.रेखा ठमके, प्रविण झोटींग ,विजुभाऊ शेंडे ,राजु मेश्राम ,रमेश आत्राम, सि.एस. मेश्राम, रंजना नहाते, बंडु बेले ,बंडुभाऊ धुळे, जनार्दन मरसकोलहे ,नारायण इंगोले ,श्रीकांत माहाजन ,नितीन खडसे ,निलेश भाऊ रोठे ,शैलेश बेलेकर, सौ. सोनु तोडासे, ताराबाई सोयाम, अर्चना गोवरदीपे ,माया कोडापे व शालीनी तोडासे हजर होते.