ढाणकी शहरात हमीभाव केंद्राची उणीव लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज


प्रतिनिधी: प्रवीण जोशी
ढाणकी


यावर्षी निसर्गराजा च्या कृपेमुळे पर्जन्यमान भरपूर झाले असल्याकारणाने यावेळी आपसूकच नाल्याला कुप नलिका व विहिरी यांना दीर्घकाळ पाणी राहिले त्यामुळे शेती ओलीत करण्याच्या श्रोताला पाणी भरपूर असल्याकारणाने सर्व शेतकऱ्यांनी आपल्या नियमित क्षेत्रापेक्षा रब्बी क्षेत्र वाढविले व हरभरा हा रब्बी हंगामातील मुख्य पीक मानल्या जाते त्यामुळे हरभरा कापणीला सुरुवात झाली असून हळूहळू हरभरा बाजारपेठेत विक्री करण्यासाठी येत आहे व लाल हरभऱ्याची आवक वाढली आहे पण हमीभावा पेक्षा कमी दराने हरभरा खरेदी केल्या जात असल्याकारणाने कुठेतरी नुकसान होत असल्याचे शेतकरी वर्गातून बोलल्या जात आहे सरकारने लाल हरभऱ्याची आधारभूत किंमत ५३३० रुपये अशी घोषित केली परंतु शेतकऱ्यांना तो हरभरा ४२०० ते ४५०० रुपये प्रति क्विंटल खरेदी केल्या जात आहेत म्हणजे आधारभूत किमतीपेक्षा ८०० ते ९०० रुपये एवढ्या कमी किमतीच्या फरकाने शेतकऱ्यांना आपला माल विकावा लागत आहे.ढाणकी शहर आजूबाजूच्या खेडेगावासाठी एक मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाते व महसूल विभागाचा व इतर बाबींचा आढावा घेतला असता हमीभाव केंद्राची या ठिकाणी गरज भासते व ती वास्तवता पण आहे तत्वतः हमीभाव केंद्र अस्तित्वात नसल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी आश्चर्य व्यक्त करत आहे हे विशेष

        

तसेच नाफेड द्वारा माल खरेदी केल्यास माल विकला याची पक्की रशीद सुद्धा दिल्या जाते शिवाय इतर खाजगी ठिकाणी काही शेतकऱ्यांनी माल विकला असता त्यांना कोणत्याही प्रकारचे रशीद दिल्या गेली नाही त्यामुळे मागील काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांची फसगत झाल्याचे ही एका शेतकऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले नाफेड केंद्र माल खरेदी करत असताना ५० किलो शेतकऱ्याचा माल व संबंधित बारदाना असलेल्या पोत्याचे वजन हे ७०० ग्रॅम पकडून खरेदी करत असते वास्तवात इतर बाहेर ठिकाणी ७०० ते ८०० ग्रॅम असे झालेले वजन मापात धरल्या जात नाही पण नाफेड केंद्रात या सर्व बाबीचे काटेकोर पालन करण्यात येत असल्यामुळे नक्की शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे जास्त पडून आर्थिक अधिकचा हातभार लागतो तसेच उमरखेड येथे नाफेड केंद्रावर माल नेताना अनेक अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे ढाणकी शहराच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना ३० ते४० किलोमीटर अंतर कापून या केंद्रावर जाणे म्हणजे एक दिव्य काम करणे होय तसेच या सर्व बाबींमुळे शेतकऱ्यावर अधिकचा आर्थिक भार पडतो चढाई उतराई मध्येच बरेच पैसे जातात व माल खरेदी करण्यास अधिकचे वाहन केंद्रावर असल्यास दोन दोन दिवस शेतकऱ्यांनी नेलेले वाहने खाली होत नाही परिणामी वाहनधारक शेतकऱ्यांना मुक्कामी राहिल्याचे सांगून अधिकचे पैसे वसूल करतात एकंदरीत काय तर ” मोले घातले रडाया नाही आसू नाही माया” अशी गत शेतकऱ्यांची झालेली आहे आपल्या स्वार्थी राजकारणामुळे शेतकऱ्यांची मात्र हालत बत्तर होताना दिसत आहे तेव्हा ढाणकी शहरात हमीभाव केंद्र गेल्या अनेक दिवसांपासून नाही त्यामुळे लोकप्रतिनिधी चे निष्क्रिय कर्तव्यशून्य व कर्मदरिद्री धोरण म्हणायचे का ??