
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव प. स. अंतर्गत येत असलेल्या स्थानिक सर्वोदय विद्यालय रिधोरा येथे भारतीय स्वतंत्रादिनी मार्च 2023च्या शालांत परीक्षेत प्रविण्यासह शाळेतून प्रथम क्रमांक मिळविलेल्या कु. मेघा रुपेश गाऊत्रे हिच्या हसते ध्वजारोहण करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री टी. झेड. माथनकर यांनी ध्वज तथा प्रतिमांचे पूजन केले. तसेच ध्वजारोहनची हि परंपरा पुढे सुरू राहील असे सांगितले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमाचे संचालन श्री आर. एस. वाघमारे यांनी केले तर प्रास्ताविक श्री. वि. एन. लोडे यांनी केले. विद्यार्थांची भाषणे झाली. आभारप्रदर्शन श्री. पि. पि. आसुटकर यांनी केले. याप्रसंगी सुभाष वाटगुळे यांनी शाळेला पाण्याच्या कॅन भेट दिल्या. कार्यक्रमाला बी. बी. कामडी, वी. टी. दूमोरे, एस. एम. बावणे, एस. वाय. भोयर तथा सरपंच उमेशभाऊ गौळकर, पोलिस पाटील ढगेश्वर मंदडे, विलास पवार, दिनकर गुरणुले तथा अनेक पालक उपस्थित होते.
